मुंबई : होळी (Holi) म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. होळी या सणाला महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखतात. तर उत्तर भारतात (North India) याला दोला यात्रा किंवा होरी असे म्हटले जाते. दक्षिण भारतात हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. 2022 मध्ये होलिका दहन 17 मार्च रोजी होणार आहे, हा दिवस गुरुवारी येतो. तर होळीचे रंग 18 मार्च (18 March) शुक्रवारी साजरे होणार आहेत. होळीच्या सणाच्या आधीच होलिकाष्टक होतात. जेव्हा होलिकाष्टक होते तेव्हा लग्न, मुंडण, लग्न, गृहप्रवेश इत्यादी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून होलाष्टक सुरू होते.
होलिका दहन 2022 तारीख आणि मुहूर्त जाणून घ्या
हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन पौर्णिमा 17 मार्च, गुरुवारी दुपारी 01:29 पासून सुरू झाली आहे, जी दुसर्या दिवशी, 18 मार्च शुक्रवारी रात्री 12:47 पर्यंत राहील. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात.या वर्षी 17 मार्च रोजी होणाऱ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त रात्री 09:06 ते 10:16 असा असणार आहे.
होळी 2022 तारीख
होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन सण म्हणजेच रंगांची होळी साजरी केली जाते. यंदा शुक्रवारी १८ मार्च रोजी होळी उत्साहात खेळली जाणार आहे.
होळीसंबंधीची आख्यायिका
असे म्हटले जाते की, हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता. परंतु, भगवान विष्णूची अशी प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादाघेऊन जळत्या अग्नीत बसली होती.
होळीकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतु, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिकाच मरण पावली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पण होलिका दहन झाल्यावर अर्थात वाईटावर चांगल्याने विजय मिळवल्याचा आनंद साजरा केला जातो. तथापि, ही वेळ भगवान विष्णूची पूजा करण्याची खास वेळ आहे
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Chanakya Niti : तुमच्या मुलांसमोर ‘या’ 4 गोष्टी ठेवा, कधीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही
Vastu : घरात लक्ष्मी यंत्राची पूजा केल्यास, धनाचा वर्षाव होईल, जाणून घ्या रंजक माहिती
17 February 2022 Panchang : 17 फेब्रुवारी 2022, गुरुवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ