नवीन वर्षात काेणत्या तारखेला असणार माघ चतुर्थी? या उपायांनी मिळणार श्री गणेशाचा आशीर्वाद

| Updated on: Dec 25, 2022 | 11:17 AM

विघ्न दूर करणाऱ्या श्रीगणेशाची विशेष प्रार्थना करून चंद्रदर्शन करून  उपवास केला जातो.

नवीन वर्षात काेणत्या तारखेला असणार माघ चतुर्थी? या उपायांनी मिळणार श्री गणेशाचा आशीर्वाद
चतुर्थी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला (Magh Chaturthi 2023) विघ्नहर्ता भगवान गणेशाला समर्पित चतुर्थी व्रत पाळले जाते. हिंदू धर्मात चतुर्थीला विषेश महत्व आहे. गणेश भक्त पूर्ण भक्तिभावाने हे व्रत पाळतात आणि रात्री चंद्र पाहिल्यानंतरच त्याची सांगता करतात. यावेळी चतुर्थीचा उपवास मंगळवार, 10 जानेवारी 2023 रोजी केला जाणार आहे.  विघ्न दूर करणाऱ्या श्रीगणेशाची विशेष प्रार्थना करून चंद्रदर्शन करून  उपवास केला जातो. मान्यतेनुसार, चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकटे नष्ट होतात आणि तसेच आयुष्यात प्रगती हाेते. जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत.

चतुर्थी 2023 शुभ मुहूर्त

माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 10 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12:09 वाजता सुरू होईल आणि 11 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2:31 वाजता समाप्त होईल. दुसरीकडे, मान्यतेनुसार, उदय तिथीनुसार कोणतीही तिथी वैध मानली जाते. चतुर्थीचे व्रत  10 जानेवारी रोजी पाळला जाणार आहे. आणि चंद्रोदय या दिवशी रात्री 8.41 वाजता होईल.

या उपायांनी होईल मनोकामना पूर्ण

  • काही विशेष मनोकामनापुरतीसाठी गणपतीची विधिपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करावे. गूळ- खोबर्‍याचे नैवेद्य दाखवावे.
  • ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून 108 वेळा श्री गणेशाय नम: या मंत्राचा जप करावा. तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचे फुल अर्पित करावे.
  • सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात दान करावे. याने सुख- सौभाग्यात वृद्धी होते.
  • उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपतीसमोर कापूर जाळून ऊँ गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
  • तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असला आणि यश हाती लागत नसेल, प्रत्येकावेळी काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे. चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी. आपल्याला कामात यश मिळेल.