Jyotish tips for property: जीवनात सुख-शांती आणि यश मिळवण्यासाठी (Success in life) लोक सर्व प्रकारचे प्रयत्न करतात. काही लोक स्वतःला यशस्वी तेव्हा समजतात जेव्हा त्यांच्याकडे स्वतःची मालमत्ता असते (Jyotish Tips For property) किंवा स्वतःचे छान घर असते. अनेकजण आपले घर (Home) बनविण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात. सेफ फ्युचरच्या दृष्टीने प्रत्येकालाच वाटते त्याच्याकडे काही जमीन, प्रॉपर्टी किंवा मालमत्ता असावी.
कधीकधी ते जमीन किंवा मालमत्ता, प्रॉपर्टी (Property) तर मिळवतात. पण, अशावेळी ते वादातही अडकतात. हा वाद हळूहळू इतका वाढतो की त्यात गुंतलेल्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवायला लागतो. यावादात लोकांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात किंवा मोठे नुकसानही सहन करावे लागते. अनेक प्रयत्न करूनही गोष्टी सुटत नसतील, तर ज्योतिषशास्त्राची मदत घेणं कधीही चांगलं. ज्योतिषशास्त्रात काही असे उपाय सांगितले गेले आहेत, जे तुम्ही केले तर तुमच्या जीवनातील मालमत्ता, प्रॉपर्टी, जमीनीचे विवाद तुम्ही बऱ्यापैकी दूर करू शकता. आम्ही तुम्हाला अशाच काही प्रभावी उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही अशा वादांवर मात करू शकता.
हिंदू धर्मात गायीची सेवा करणे हे शुभ कार्य मानले जाते. जमिनीचा वाद दूर करण्यासाठी दर रविवारी गायीला गूळ खाऊ घाला. त्यासाठी दर रविवारी गोशाळेत जाऊन तपकीरी रंगाच्या गाईला गूळ खाऊ घालावा. गूळ खायला देताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. गाईला गूळ खाऊ घालताना तो गूळ तिच्या समोर फेकू नये. तुम्हाला हाताने गूळ गाईला द्यायचा भिती वाटत असाल तर गूळ एका जागी ठेवून गाईला खाऊ घालू शकता.पण, गूळ फेकू नका.
सनातन धर्मात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीने दान केले तर त्याला त्याचे पुण्य तर लाभतेच, पण त्याला त्याच्या पापांपासून मुक्तीही मिळते. जमिनीवरून सुरू असलेला वाद तुमची डोकेदुखी बनला आहे आणि त्यातून सुटका हवी असेल तर अन्नदान करा. ज्योतिष शास्त्रानुसार यासाठी शुक्रवारी गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. गरिबांच्या आशीर्वादामुळे तुमचे दु:ख बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
जर तुम्हाला जमीन खरेदी-विक्री किंवा त्याच्याशी संबंधित इतर कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही दुर्ग देवीला शरम गेले पाहिजे. देवी दुर्गा प्रसन्न झाली आणि जर तिची कृपा झाली तर यापेक्षा चांगले काय असू शकते. ज्यांना जमिनीशी संबंधित वाद आहेत त्यांनी देवी दुर्गेच्या मंत्रांचा जप करावा. देवी मातेची आराधना करताना तिच्यासमोर तुमची समस्या सांगा. असे केल्याने तुमच्या जीवनात सुरू असलेला प्रॉपर्टी तसंच जमिनीचा वाद मिटण्याची शक्यता आहे.
संकट दूर करणार्या हनुमानजींची पूजा करूनही तुम्ही या समस्येवर मात मिळवू शकता. प्रत्येक मंगळवारी मंदिरात जाऊन काही उपाय करावे लागतात. यासाठी मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमानजींची पूजा करा आणि यादरम्यान हनुमान चालिसाचे पठण करा. शक्य असल्यास हनुमानजींना शेंदूर अर्पण करून त्यांना प्रसादाच्या वस्तू अर्पण करा आणि नंतर ते साहित्य गरिबांना दान करा.
(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही.सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती इथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. )