Pandharpur Wari 2022 : भात शेतीत रोपांच्या सहाय्याने साकारली विठ्ठल मूर्ती, वातुंडेतील बाळकृष्ण शिंदे यांची अशीही विठ्ठलभक्ती

| Updated on: Jul 09, 2022 | 8:33 PM

शेतकऱ्यानं भात शेतीच्या रोपांतून ही विठ्ठलाची मूर्ती तयार केली. मुळशी तालुक्यातील वातुंडे येथील बाळकृष्ण शिंदे यांनी शेतात ही मूर्ती साकारली. महिनाभरापूर्वी त्यांनी धानाचे बियाणे पेरले होते.

Pandharpur Wari 2022 : भात शेतीत रोपांच्या सहाय्याने साकारली विठ्ठल मूर्ती, वातुंडेतील बाळकृष्ण शिंदे यांची अशीही विठ्ठलभक्ती
भात शेतीत रोपांच्या सहाय्याने साकारली विठ्ठल मूर्ती
Image Credit source: t v 9
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या भात शेतीत रोपांच्या सहाय्याने विठ्ठलाची मूर्ती साकारली. मुळशी (Mulshi) तालुक्यातील वातुंडे (Vatunde) गावात बाळकृष्ण शिंदे (Balkrishna Shinde) सामायिक शेतात ही विठ्ठल मूर्ती साकारली. महिन्याभरापूर्वीच पेरलेली भाताची रोपं गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उगवून आली. यात मूर्ती दिसते. संपूर्ण राज्यातील वारकऱ्यांना ओढ लागली आहे ती रविवारच्या आषाढी एकादशीची. रविवारी आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक हे पंढरपूरला आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला जात असतात. रविवारी होणाऱ्या आषाढी निमित्त पुण्यातील प्रती पंढरपूर देखील सजलं आहे. खरंतर गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी साजरी करण्यात आलेली नव्हती. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाच सावट दूर झाल्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने प्रति पंढरपूरच्या या विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला लाखो पुणेकर येणार असल्याचे विश्र्वस्तांकडून सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ

गुलाबराव पाटलांनी घेतलं विठुरायाचं दर्शन

मंदिर प्रशासनाकडून यंदाच्या वर्षी मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. त्यासोबतच लाखो भाविक या ठिकाणी येणार असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्याचे मोठं आव्हान पोलीस शासनासमोर आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणादेखील सतर्क आहे. आम्ही हा उत्सव व्यवस्थित पार पाडू, अशी माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे. दरम्यान, आषाढी एकादशी निमित्त आमदार गुलाबराव पाटील यांनी पंढरपुरात घेतलं विठुरायाचं दर्शन घेतलं. राज्यात भरपूर पाऊस पडू दे, शेतकऱ्याला भरपूर अन्नधान्य पिकू दे, राज्यात शांतता नांदू दे असं साकडं गुलाबराव पाटलांनी विठुरायाला घातलं. दरम्यान, शिंदे सरकारमध्ये आपल्याला चांगलं मंत्रीपद मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी केली असावी, अशीही चर्चा आहे.

दोन खासदारांमध्ये श्रेयवादाची लढाई

जळगाव जिल्ह्यात भाजपाची श्रेयवादाची लढाई सुरू झाली. आषाढीवारी निमित्त भुसावळ रेल्वे स्टेशनवर भाजपच्या दोन खासदारांमध्ये बॅनरबाजी वरून श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. रक्षा खडसेंचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर आक्रमक झाले. भाजपाचे उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर बाजी करत असताना उन्मेश पाटलांच्या बॅनरवरील फोटोवर खासदार रक्षा खडसेंचे बॅनर लावण्यात आले. उन्मेश पाटलांचं बॅनर खासदार रक्षक खडसेंच्या कार्यकर्त्याकडून झाकण्यात आलं. विशेषता रावसाहेब दानवे यांचा फोटोही झाकला गेला. आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांसाठी भुसावळ रेल्वेकडून पंढरपूर जाण्यासाठी स्पेशल रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. भाजपचे खासदार उमेश पाटील यांच्या बॅनरवर रक्षा खडसेंचा फोटो गायब होता. त्यामुळेच रक्षा खडसेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले.