मुंबई : अधिकमासातील दुसरी एकादशी शनिवार, 12 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. तिला कमला एकादशी किंवा पुरुषोत्तमी एकादशी असेही म्हणतात. आधिकमासाच्या परमा एकादशीला (Parma Ekadashi 2023) भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने दुर्लभ सिद्धी प्राप्त होते. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत खूप शुभ मानले जाते. परम एकादशीला केलेल्या पुण्यांचे फळ अनेक पटीने मिळते. पुराणात परमा एकादशीचा परिणाम अश्वमेध यज्ञाप्रमाणेच वर्णिला आहे.
हिंदू दिनदर्शीकेनुसार, अधीकामाच्या कृष्ण पक्षातील परमा एकादशी तिथी शुक्रवार, 11 ऑगस्ट रोजी सकाळी 05.06 वाजता सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी सकाळी 06.31 वाजता समाप्त होईल.
परमा एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त शनिवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 07.28 ते 09.07 पर्यंत असेल. तर परमा एकादशीचे व्रत 13 ऑगस्ट रोजी पहाटे 05.49 ते 08.19 या वेळेत पाळण्यात येईल.
आधिकमासाच्या परमा एकादशीला भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भक्तांना पूजेचे पूर्ण फळ मिळते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने घरामध्ये सौभाग्य आणि समृद्धी येते. परम एकादशी हे कठीण व्रतांपैकी एक आहे. बरेच लोक हे व्रत पाण्याशिवाय पाळतात, तर काही लोक फक्त भागवत चरणामृत घेतात.
परमा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. नंतर निर्जला व्रताचा संकल्प करून विष्णुपुराण पठण करावे. रात्रीच्या चारही तासांनी विष्णू आणि शिवजींची पूजा करावी. पहिल्या टप्प्यात नारळ, दुसऱ्या टप्प्यात बेल, तिसऱ्या टप्प्यात धोत्र्याचं फळं आणि चौथ्या टप्प्यात संत्रा व सुपारी अर्पण करा. द्वादशीच्या दिवशी सकाळी देवाची पूजा करून उपवास सोडावा.
या व्रतामध्ये पाच दिवस पंचरात्री व्रत पाळले जाते. भक्त पूर्ण भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा करतात. यानंतर ब्राह्मणांना भोजन व दान दिले जाते. असे म्हटले जाते की जो कोणी या दिवशी व्रत आणि पूजा करतो त्याचे सर्व संकट दूर होतात. या दिवशी भगवान विष्णूसोबत शिवाचीही पूजा केली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)