मुंबई : पौराणिक कथेनुसार भगवान परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार मानला जातो. त्यांचा जन्म वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला झाला. यावर्षी भगवान परशुरामांची जयंती (Parshuram jayanti 2023) 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी साजरी केली जाईल. अक्षय तृतीयेचा (Akshay Tritiya 2023) सणही याच दिवशी साजरा केला जातो. भगवान परशुरामांनी सनातन धर्माच्या संवर्धनाचे कार्य केले होते. राजांकडून होत असलेले अधर्म आणि पाप संपवण्यासाठी परशुरामांचा जन्म पृथ्वीवर झाला असे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्यास विशेष फल प्राप्त होते. महादेवाचे परम उपासक असल्यामुळे परशुरामजींना रुद्र शक्ती असेही म्हणतात.
परशुराम जयंतीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
आयुष्मान योग- शनिवार, 22 एप्रिल सकाळी 09:24 वाजता
पौराणिक मान्यतेनुसार जमदग्नी ऋषी हे भगवान परशुरामांचे पिता होते. जमदग्नी ऋषींनी चंद्रवंशी राजाची कन्या रेणुका हिच्याशी विवाह केला. जमदग्नी आणि रेणुका ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी मोठा यज्ञ केला. या यज्ञावर प्रसन्न होऊन भगवान इंद्राने त्यांना तेजस्वी पुत्राचे वरदान दिले आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला. ऋषींनी आपल्या मुलाचे नाव राम ठेवले. रामाला भगवान शिवाकडून शस्त्रास्त्रांचे ज्ञान प्राप्त झाले आणि शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपली कुऱ्हाड म्हणजेच परशु त्याला दिली. त्यामुळे त्यांना परशुराम म्हणतात. चिरंजीवी होण्यात धन्यता मानली. रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये त्यांचे वर्णन आहे. त्यांनीच श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र उपलब्ध करून दिले आणि महाभारत काळात भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांना शस्त्रांचे ज्ञान दिले.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)