मुंबई : पितृ पक्षातील मघा श्राद्ध आज आहे. पितृ पक्षातील (Pitru Paksha) मघा श्राद्ध हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात मघा नक्षत्र हे दहावे नक्षत्र आहे. हे श्राद्ध पितरांच्या सन्मानार्थ केले जाते. हे श्राद्ध इंदिरा एकादशीच्या दिवशी येत असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. केतू हा मघा नक्षत्राचा स्वामी आहे. मघा श्राद्धात पितरांच्या शांतीसाठी विधी कसे केले जातात आणि तर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेऊया.
मघा श्राद्धासह पितृ पक्ष श्राद्धाचे महत्त्व मत्स्य पुराणात सांगितले आहे. पितृ पक्षातील मघा श्राद्ध हा शुभ दिवस आहे. हा एक विशेष दिवस आहे जेव्हा मघा नक्षत्र बलवान असते, यामागचे कारण म्हणजे मघा नक्षत्रावर पितरांचा प्रभाव असतो. या तिथीला तर्पण विधी केल्याने पितरांचे आत्मा प्रसन्न होतो आणि पुण्यही प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. या पूजेमुळे पितरांना मुक्ती आणि शांती प्राप्त होते. तर्पण आणि पिंडदानाने तृप्त झाल्यानंतर पितरांकडून आशीर्वाद प्राप्त होतो.
श्राद्धाच्या वेळी आपल्या पूर्वजांचे फोटो समोर ठेवा. त्यांना चंदनाची माळ अर्पण करून शुभ्र चंदनाचा तिलक लावावा. या दिवशी पितरांना खीर अर्पण करा. वेलची, केशर, साखर आणि मध एकत्र करून खीर बनवा आणि भाताचे तीन पिंडं बनवून आपल्या पूर्वजांना अर्पण करा. यानंतर पितरांच्या स्मरनार्थ गाईला नैवेद्याचे पान लावा. या दिवशी ब्राम्हणाला भोजनदान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
कुतुप मुहूर्त- सकाळी 11:45 ते दुपारी 12:32 पर्यंत
रोहीण मुहूर्त- दुपारी १२:३२ ते १:१९
दुपारची वेळ – दुपारी 1:19 ते 3:39 पर्यंत
11 ऑक्टोबर 2023, बुधवार- द्वादशी श्राद्ध
12 ऑक्टोबर 2023, गुरुवार- त्रयोदशी श्राद्ध
13 ऑक्टोबर 2023, शुक्रवार- चतुर्दशी श्राद्ध
14 ऑक्टोबर 2023, शनिवार- सर्व पितृ अमावस्या
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)