Pitru Dosh : प्रत्त्येक कामात येत असेल विघ्न तर असू शकतो पितृदोष, हे उपाय ठरतील प्रभावी

| Updated on: Mar 31, 2023 | 9:01 PM

बऱ्याचदा आयुष्यात येणाऱ्या विघ्नांमागे पितृदोष असू शकतो. म्हणूनच जीवनात काही चांगले घडत नसेल तर त्याची कारणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Pitru Dosh : प्रत्त्येक कामात येत असेल विघ्न तर असू शकतो पितृदोष, हे उपाय ठरतील प्रभावी
पितृदोष
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : पितृदोष अत्यंत क्लेशदायक आहे. ज्याच्या कुंडलीत पितृदोष (Pitru Dosh) असतो त्याला अनेक प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यात प्रचंड समस्या येऊ लागतात. म्हणूनच पितृदोषाची लक्षणे ओळखून त्यानुसार उपाययोजना करून हा दोष दूर करणे आवश्यक आहे. पितृदोष म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया.

कसा असतो पितृदोष?

असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याचे अंतिम संस्कार नियम आणि विधीनुसार केले गेले नाहीत किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास, त्याच्याशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना अनेक पिढ्या पितृदोषाचा सामना करावा लागतो. योग्य अंत्यसंस्कार व पितरांचे श्राद्ध न करणे, पितरांचा अपमान करणे, घरातील स्त्रियांचा आदर न करणे, प्राण्यांची हत्या, ज्येष्ठांचा अपमान करणे अशा अनेक कारणांमुळे पितृदोष लागतो.

पितृदोषाची लक्षणे कोणती?

बऱ्याचदा आयुष्यात येणाऱ्या विघ्नांमागे पितृदोष असू शकतो. म्हणूनच जीवनात काही चांगले घडत नसेल तर त्याची कारणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पितृदोष ही समस्या तुम्हाला किरकोळ वाटण्याची शक्यता आहे. मात्र तसे नसून पितृदोषामुळे जीवनात संततीचे सुख मिळत नाही. नोकरी, व्यवसायात कष्ट करूनही नुकसान सहन करावे लागते. कुटुंबात अशांतता राहते. आणि एखाद्या व्यक्तीचे आरोग्य खराब राहते. जीवनातील शुभ कार्यात अडथळे येतात.

हे सुद्धा वाचा

पितृदोष दूर करण्याचे उपाय

  • संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि नाग स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्र सूक्त, पितृ स्तोत्र आणि नवग्रह स्तोत्र पठण करा. यामुळे पितृदोषात शांती मिळते.
  • इष्ट देवतेची आणि कुल देवतेची रोज पूजा करा. असे केल्याने पितृदोषही नाहीसा होतो.
  • भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा, श्रीमद्भागवत गीतेचा पाठ करा, यामुळे पितरांची शांती होते आणि दोष कमी होतात.
  • पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजयाच्या मंत्राने भगवान शिवाला अभिषेक करावा.
    घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आपल्या दिवंगत नातेवाईकांचे फोटो लावा आणि त्यांना रोज नमस्कार करा. असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
  • रोज नियमितपणे हनुमान चालिसाचा पाठ करा. हनुमान चालिसाचा पाठ केल्याने हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो.
  • गरजू किंवा ब्राह्मणांना त्यांच्या दिवंगत नातेवाईकांच्या मृत्यूच्या तिथीला अन्नदान करा. दिवंगत नातेवाईकांच्या आवडीनुसार जेवण बनवावे.
  • दररोज पितृकवच पठण करा, असे केल्याने पितृदोष शांती मिळते.
  • आपल्या कुवतीनुसार गरिबांना वस्त्र, अन्न इत्यादी दान करा. असे केल्याने हा दोषही दूर होतो.
  • दुपारी पिंपळाच्या झाडावर पाणी, फुले, अक्षत, दूध, गंगाजल, काळे तीळ अर्पण करा आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागा.
  • पूर्वजांच्या नावाने फलदायी, सावलीची झाडे लावा. यामुळे दोषही कमी होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)