पितृदोष
Image Credit source: Social Media
मुंबई : हिंदू धर्मात पितृ पक्षाचे 15 दिवस पितरांना समर्पित असतात. पितृ पक्ष हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि दान करण्याचा विशेष काळ आहे. एवढेच नाही तर पितृ दोष दूर करण्यासाठी उपाय करण्यासाठी पितृ पक्षाचा काळही उत्तम मानला जातो. यावर्षी पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 पासून सुरू होत आहे, जो 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालणार आहे. पितृदोषाने त्रस्त असलेल्या व्यक्तीला अनेक प्रकारे त्याचे संकेत मिळतात. पितृदोषाची (Pitru Dosh) लक्षणे धर्म आणि ज्योतिषशास्त्रात सांगितली आहेत. तुमच्या घरात किंवा जीवनात अशा घटना घडत असतील तर सावध राहून पितृदोष टाळण्यासाठी उपाययोजना करा. चला जाणून घेऊया पितृ दोषाची लक्षणे
अशा घटना पितृ दोषाची लक्षणे आहेत
- पूर्वजांना राग आला तर जीवनात अनेक संकटे येतात. याला पितृदोष म्हणतात. त्यामुळे घरात अनेक प्रकारच्या घटना घडू लागतात.
- जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी विनाकारण तणावात असेल आणि तुम्हाला त्याचे कारण समजत नसेल, तर त्यामागचे एक कारण पितृदोष असू शकते. अशा स्थितीत पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करावेत.
- कोणत्याही कारणाशिवाय तुमची झोप उडाली आणि तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील तर हे देखील पितरांच्या रागाचे कारण असू शकते.
- पिंपळाच्या झाडात त्रिदेव वास करतात, पण घरात पिंपळाचे झाड लावणे फारच अशुभ आहे. अनेकदा पिपळाचे झाड स्वतःहून घरांमध्ये उगवते. जर तुमच्या घरात पीपळाचे रोप स्वतःच उगवले तर ते पितरांच्या नाराजीचे लक्षण असू शकते, पण ते तोडून न टाकता त्याची पूजा केल्यानंतर ते माती सोबत बाहेर काढून मंदिरात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लावावे.
- घरामध्ये अचानक तुळस सुकणे देखील पितृदोषाचे लक्षण असू शकते. ही घटना सांगते की कुटुंबात काही मोठी समस्या असू शकते. त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करा. तसेच दानधर्म करा, देवपूजा करा.
- घरातील रोजची भांडणे हे पितृदोषाचे लक्षण आहे. पितरांची नाराजी घरातील सुख-शांती हिरावून घेते. नात्यात अंतर आणते.
- याशिवाय विवाहयोग्य मुला-मुलीचे लग्न न होणे, संततीचे सुख न मिळणे, संतती वाढीस अडथळा येणे हेही पितृदोषाचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत पितृदोषापासून लवकरात लवकर सुटका करण्यासाठी उपाय योजले पाहिजेत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)