Pitru Paksha 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, पत्रिकेत अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष (Pitrudosh). बहुतेक लोकांना या दोषाबद्दल पुरेसे ज्ञान नसते. ज्या व्यक्तीचे पूर्वज तृप्त नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. कुटुंबातील सदस्यांचे निधन झाल्यानंतर त्याच्ये श्राद्ध कर्म न झाले असल्यास, दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध (Shraddha) न केल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो. परिणामी अनेक कार्यामध्ये अडथळे येतात. याशिवाय, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू (Rahu) आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्याचा केतूशी संयोग होतो, अशा स्थितीत पितृदोष तयार होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृदोषामुळे कुटुंबात समस्यांची मालिका सुरू होते. पितृदोष असेल तर काही लक्षणे दैनंदिन जीवनात दिसून येतात. पितृदोष असल्यास कोणत्या कोणत्या गोष्टी होतात आणि पितृ दोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घेऊया.
कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत सतत खराब राहणे. उपचार करूनही कुटुंबातील काही सदस्य नेहमी आजारी असणे हे पितृदोषाचे लक्षण असू शकते.
पितृदोषामुळे कुटुंबातील सदस्यांना अपघातासारख्या समस्येला वारंवार समोर जावे लागू शकते. यासोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व शुभ कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात.
कुटुंबातील एखाद्याचे लग्न न होणे देखील पितृदोष असू शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती लग्नासाठी पात्र आहे, परंतु लग्न जमत नाही. याशिवाय कुटुंबातील व्यक्ती लग्न करूनही घटस्फोट घेते किंवा काही कारणास्तव वेगळे राहते तो देखील पितृदोष असू शकतो.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)