मुंबई : सध्या पितृपक्षाचा (Pitru Paksha) काळ सुरू आहे. या काळात आपल्या पुर्वजांच्या स्मरणार्थ पिंडदान आणि तर्पन केले आते. पितृपक्षात केलेल्या या विधीमुळे पितरांना मोक्ष आणि गती प्राप्त होते, तसेत वंशजांना पितृ ऋणातून मुक्ती मिळते. श्राद्धाशी संबंधित सर्व विधी लोकं घरीच करतात, परंतु काही प्रमुख तीर्थक्षेत्रांचाही उल्लेख शास्त्रात आढळतो. या ठिकाणी श्राद्ध विधी किंवा पिंड दान केल्याने व्यक्तीला विशेष आशिर्वाद प्राप्त होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जाणून घ्या की कोणकोणते स्थान पिंडदान, तर्पण किंवा श्राद्ध पितरांना अर्पण केल्याने त्यांना मोक्ष मिळेल.
बिहार राज्यातील फाल्गु नदीच्या काठावर मगध प्रदेशात वसलेले, हे सर्वात प्राचीन आणि पवित्र तीर्थस्थानांपैकी एक आहे, जिथे लोक आपल्या पूर्वजांचे पिंडदान करण्यासाठी देश-विदेशातून येतात. विष्णुपुराण आणि वायुपुराणात याला मोक्षभूमी म्हटले आहे. याला विष्णूनगरी असेही म्हणतात. असे म्हणतात की येथे विष्णू स्वतः पितृदेवतेच्या रूपात उपस्थित आहेत आणि ब्रह्माजींनी स्वतः येथे त्यांच्या पूर्वजांचे पिंडदान दिके होते. त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी त्यांचे पिता आणि राजा दशरथ यांचे पिंडदानही येथे केले. असे म्हटले जाते की येथे केले जाणारे पिंडदान 108 कुळांना आणि सात पिढ्यांपर्यंत मोक्ष देते. सध्या गयामध्ये 48 वेद्या आहेत, जिथे पिंडदान केले जाते. येथे एक स्थान आहे – अक्षयवट, जिथे पितरांसाठी दान करण्याची परंपरा आहे. येथे केलेले दान चिरंतन असते असे म्हणतात. तुम्ही जितके जास्त दान कराल त्याच्या तुम्हाला नक्कीच परत मिळेल.
पितरांना भूतबाधांपासून मुक्त करण्यासाठी काशीमध्ये श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. सात्विक, राजसिक, तामसिक – हे तीन प्रकारचे भूतआत्मे मानले जातात आणि यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काशीच्या पिशाच मोचन कुंडात तीन मातीच्या कलशांची स्थापना केली जाते आणि त्या कलशावर काळे, लाल आणि पांढरे ध्वज विष्णूचे प्रतीक म्हणून फडकवले जातात. यानंतर श्राद्ध केले जाते. येथे श्राद्ध केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, म्हणूनच धर्म आणि अध्यात्माची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशीला मोक्षाची नगरी असेही म्हणतात. काशीमध्ये श्राद्ध करणार्या व्यक्तीच्या घरात नेहमी आनंद राहतो.
हरिद्वारमधील नारायणी शिलाजवळ पूर्वजांचे पिंडदान केले जाते. असे मानले जाते की येथे पिंडदान केल्याने पिंडदान करणाऱ्या व्यक्तीवर पितरांचा आशीर्वाद नेहमी राहतो, त्याच्या जीवनात नेहमी सुख-शांती राहते आणि नशीब नेहमी साथ देते.
कुरुक्षेत्र, हरियाणा येथील पेहोवा तीर्थ येथे आणि विशेषत: अमावस्येच्या दिवशी अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध करणे उत्तम मानले जाते. अपघातात किंवा शस्त्राच्या हल्ल्यात अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध येथे केले जाते. महाभारतानुसार धर्मराजा युधिष्ठिर यांनी युद्धात मारल्या गेलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांचे श्राद्ध आणि पिंडदान पेहोवा तीर्थ येथेच केले होते. वामन पुराणात या स्थानाविषयी उल्लेख आहे की, प्राचीन काळी राजा पृथुने आपला वंशज राजा वेण याचे श्राद्ध येथे केले होते. असे म्हणतात की येथे श्राद्ध किंवा पिंडदान करणार्या व्यक्तीला एक उत्कृष्ट संतान प्राप्त होते, जी वृद्धापकाळात त्याचा आधार बनते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)