मुंबई : हिंदू धर्मातील प्रत्येक पूजेप्रमाणे पितृपक्षातल्या (Pitru Paksha 2023) श्राद्धालाही विशेष महत्त्वाचे मानले जाते. पितरांना तर्पण अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांना गती प्राप्त होते. दरवर्षी भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील 15 दिवस खूप खास असतात कारण या काळात पितृपक्ष असतो आणि कुटूंबीय त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध करतात. मात्र यंदा पितृपक्ष उशिरा सुरू होणार आहे. यावर्षी पितृपक्ष 29 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होईल आणि 14 ऑक्टोबरपर्यंत राहील. आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी पितृपक्ष उशिरा सुरू होत आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे अधिकामास. तीन वर्षातून एकदा जास्तीचा महिना येतो ज्याला अधिकारमास किंवा मलमास म्हणतात. यामुळेच यंदा पितृपक्ष उशिरा सुरू होत आहे.
पितृपक्षात लोकं त्यांच्या मृत्युतिथीनुसार त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध करतात. या काळात पितरांची विधिानुसार पूजा केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. ज्या घरामध्ये पूर्वज सुखी असतात, तिथे नेहमी सुख आणि आशीर्वाद राहतात. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ते गया येथे जाऊन पिंडदान करतात आणि ते विशेष मानले जाते. पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंडदान महत्त्वाचे मानले जाते. जातो ज्यामुळे आत्मा तृप्त होतो आणि पृथ्वीवरील आसक्तीचा त्याग करून तृप्त होतो.
पितृपक्षात लोकं पिंडदान आणि तर्पण त्यांच्या घरी पितरांना अर्पण करतात. पण बिहारच्या गयामध्ये पिंड दान केले असेल तर त्याचे विशेष महत्त्व आहे, असे मानले जाते. गयामध्ये पिंडदान केल्याने 108 कुळ आणि 7 पिढ्यांचा उद्धार होतो असे म्हणतात. गरुड पुराणातही गयामध्ये केलेल्या पिंडदानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. भगवान राम आणि माता सीता यांनी गया येथे जाऊन पिता दशरथ यांचे पिंडदान केल्याचे सांगितले जाते. या पिंडदानानंतर राजा दशरथाच्या आत्म्याला शांती मिळाली आणि त्यांनी स्वर्गप्राप्ती झाली, असे म्हटले जाते. त्यामुळे गयाजीमध्ये पिंड दान करणे महत्त्वाचे मानले जाते. गरुड पुराणानुसार, भगवान श्री हरी गयामध्ये पितृदेवता म्हणून विराजमान आहेत म्हणून त्यांना पितृतीर्थ असेही म्हणतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)