मुंबई, पोंगल (Pongal 2023) हा दक्षिण भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा मुख्यतः तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये साजरा केला जातो. दक्षिण भारतातील लोकं हा सण नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. ज्या वेळी उत्तर भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याच वेळी दक्षिण भारतात पोंगल हा सण साजरा केला जातो. पोंगलचा हा सण चार दिवस चालतो. पोंगल सण दक्षिण भारतात चार दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तमिळ भाषेत पोंगल म्हणजे बूम किंवा उलथापालथ. पोंगल सणाच्या दिवशी पाऊस, सूर्यप्रकाश आणि शेतीशी संबंधित गोष्टींची पूजा आनंद आणि समृद्धीसाठी केली जाते.
तामिळ दिनदर्शीकेनुसार, जेव्हा सूर्य धनु राशीतून बाहेर पडतो आणि 14 किंवा 15 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते. यंदा 15 जानेवारी ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत पोंगल सण साजरा केला जाणार आहे.
पोंगल हा सण चार दिवस वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. या चार दिवसीय उत्सवाचा पहिला दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा केला जातो. या दिवशी इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते. पोंगल सणाचा दुसरा दिवस सूर्य पोंगल, तिसरा दिवस मट्टू पोंगल आणि चौथा दिवस कन्नम पोंगल म्हणून साजरा केला जातो.
सूर्याच्या उत्तरायणानंतर उत्तर भारतात मकर संक्रांत ज्या प्रकारे साजरी केली जाते, तसेच दक्षिणेत पोंगल सण साजरा केला जातो. पारंपारिकपणे, हा सण समृद्धीचे प्रतीक मानला जातो, ज्यामध्ये समृद्धी आणण्यासाठी पाऊस, सूर्यप्रकाश आणि शेतातील पशू धनाची पूजा केली जाते.