Pradosh Vrat 2024 : आज भौम प्रदोष व्रत, अशाप्रकारे करा महादेवाची आराधना

| Updated on: Feb 09, 2024 | 7:33 PM

आज भैम प्रदोष व्रत आहे. या दिवशी महादेवासोबतच बजरंगबलीची उपासना केल्याने संकटापासून आणि कर्जापासून सुटका होण्यात मदत मिळते. या दिवशी महादेवाची उपासना कशी करावी, त्याची पद्धत काय आहे ते आपण जाणून घेऊया.

Pradosh Vrat 2024 : आज भौम प्रदोष व्रत, अशाप्रकारे करा महादेवाची आराधना
प्रदोष व्रत
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आज भौम प्रदोष व्रत (Pradosh Vrat) आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. मंगळवारी येणारा प्रदोष भौम प्रदोष म्हणून ओळखला जातो. शास्त्रामध्ये कर्ज फेडण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी मंगळाशी संबंधित वस्तू जसे की गूळ, मसूर, लाल वस्त्र, तांबे इत्यादींचे दान केल्यास शंभर गायींचे दान केल्यासारखे फळ मिळते. प्रदोषाचा दिवस भगवान शंकराशी संबंधित आहे. पुराणात असे म्हटले आहे की जो व्यक्ती त्रयोदशीच्या रात्री पहिल्या चतुर्थांशात शिवाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवतो त्याच्या सर्व समस्या दूर होतात.

भौम प्रदोष व्रत पूजा पद्धत

या दिवशी भक्ताने आपल्या दैनंदिन व्यवहारातून निवृत्त होऊन उपवासाचा संकल्प करावा आणि दिवसभर उपवास करावा. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळच्या पूर्वार्धात पुन्हा स्नान करावे, शुभ्र वस्त्रे परिधान करून प्रदोष व्रताच्या पूजेसाठी ईशान्य कोपर्‍यात जागा निवडावी. पूजेचे ठिकाण गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शुध्द केल्यानंतर शेणाने मंडप तयार करावा. या मंडपात पाच रंगांनी कमळाच्या फुलाचा आकार तयार करा.तुम्हाला हवे असल्यास कागदावर वेगवेगळ्या रंगांनी बनवलेल्या कमळाच्या फुलाचा आकारही बाजारात विकत घेऊ शकता. तसेच भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो ठेवा.

अशा प्रकारे सर्व पूजा साहित्य सोबत ठेवून आसनावर बसून ईशान्य दिशेला तोंड करून भगवान शंकराची पूजा करावी. पूजेच्या प्रत्येक विधीनंतर ‘ओम नमः शिवाय’ चा जप करावा. जसे फुले अर्पण करा आणि ‘ओम नमः शिवाय’ म्हणा, फळे अर्पण करा आणि ‘ओम नमः शिवाय’ म्हणा. भगवान शंकराची पूजा केल्यानंतर हनुमानाचीही पूजा करून त्यांना शेंदूर अर्पण करावा. कारण हे भौम प्रदोष व्रत आहे आणि भौम प्रदोषात हनुमानजींची पूजा केली जाते. असे मानले जाते की भौम प्रदोष व्रताच्या दिवशी असे केल्यास कर्जापासून लवकर मुक्ती मिळते.

हे सुद्धा वाचा

प्रदोष व्रत 2024 शुभ मुहूर्त

  • पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी सुरू होते – 8 जानेवारी रात्री 11.26 वाजता
  • पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीची समाप्ती – 9 जानेवारी रात्री 10:18 वाजता
  • प्रदोष व्रत 2024 तारीख- 9 जानेवारी
  • प्रदोष व्रत पूजा मुहूर्त- 9 जानेवारी 2024 सायंकाळी 5:13 ते रात्री 8

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)