मुंबई : प्रत्येक त्रयोदशीला प्रदोष व्रत (Pradosh Vrat Pooja) केले जाते. प्रदोष व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. अशा प्रकारे एका महिन्यात 2 प्रदोष व्रत केले जातात. आज जेष्ठ महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रताचा दिवस शिवभक्तांसाठी खास असतो. प्रदोष काळात भोलेनाथाची पूजा केल्याने ते आनंदी होतात आणि भक्तांना अपार सुख आणि समृद्धी देतात. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. आज, 15 जून 2023, गुरुवारी प्रदोष व्रत असल्यामुळे याला गुरु प्रदोष व्रत म्हटले जाईल.
हिंदी पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी गुरुवार, 15 जून 2023 रोजी सकाळी 8.32 पासून सुरू होईल आणि उद्या, 16 जून 2023, शुक्रवारी सकाळी 8.39 वाजता समाप्त होईल. प्रदोष काळात महादेवाची पूजा केली जात असल्याने हे व्रत गुरुवार, 15 जून रोजीच पाळले जाणार आहे. प्रदोष व्रतामध्ये आज 15 जून 2023 रोजी सायंकाळी 07.20 ते 09.21 या वेळेत शिवाची पूजा करणे शुभ राहील. दुसरीकडे, पूजेचे अमृत – सर्वोत्तम शुभ मुहूर्त 15 जून रोजी संध्याकाळी 07.20 ते 08.36 पर्यंत असेल. याशिवाय सूर्योदयापासून मध्यरात्री 02:03 पर्यंत सुकर्म योग राहील. सुकर्म योगात केलेले शुभ कार्य, पूजा आणि पठण यामुळे भरपूर लाभ मिळतात.
भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रताचा दिवस खूप खास आहे. या दिवशी नियमानुसार भगवान शंकराची पूजा करून अभिषेक केल्याने भरपूर लाभ होतो. यासोबतच भगवान शिवाच्या अत्यंत शक्तिशाली मंत्राचा जप केल्याने शिव पंचाक्षर मंत्र सर्व दुःख दूर करतो आणि अपार सुख आणि समृद्धी देतो. म्हणून प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपंचाक्षरीचे पठण करावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)