Pradosh Vrat: या तारखेला येणार ऑगस्ट महिन्यातला शेवटचा प्रदोष व्रत

| Updated on: Aug 21, 2022 | 4:24 PM

प्रदोष व्रताबद्दल असे मानले जाते की शास्त्रानुसार व्रत केल्याने साधकाला भगवान शिव (Bhagwan Shiv) सोबत पार्वतीची कृपा देखील प्राप्त होते. पंचांगानुसार ऑगस्ट महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत 24 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.

Pradosh Vrat: या तारखेला येणार ऑगस्ट महिन्यातला शेवटचा प्रदोष व्रत
महादेवाची पूजा
Image Credit source: Social Media
Follow us on

हिंदू धर्मात त्रयोदशी तिथी भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ आणि पुण्यपूर्ण मानली जाते. सनातन परंपरेत या पवित्र तिथीला प्रदोष व्रत (Pradosh Vrat) ठेवण्याची परंपरा आहे, या व्रताने जीवनाशी संबंधित सर्व सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. प्रदोष व्रताबद्दल असे मानले जाते की शास्त्रानुसार व्रत केल्याने साधकाला भगवान शिव (Bhagwan Shiv) सोबत पार्वतीची कृपा देखील प्राप्त होते. पंचांगानुसार ऑगस्ट महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत 24 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. प्रदोष व्रताची पूजा पद्धत (Pradosh Vrat Pooja), शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

 

बुध प्रदोष व्रतासाठी शुभ मुहूर्त

 

हे सुद्धा वाचा

पंचांगानुसार त्रयोदशी तिथी 24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 08:30 ते 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:37 पर्यंत राहील, तर प्रदोष काळ 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी संध्याकाळी 06:52 ते 09:04 पर्यंत राहील. अशाप्रकारे, सुमारे दोन तास चालणाऱ्या प्रदोष कालावधीत शिव साधक आपली उपासना करू शकतील. विशिष्ट दिवशी येणारे प्रदोष व्रत त्यांच्या नावावर असल्याने त्याला बुध प्रदोष व्रत असे म्हणतात.

 

बुध प्रदोष व्रताची उपासना पद्धत

 

साधकाने त्रयोदशी तिथीला सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे आणि स्नान करून ध्यान करून सर्वप्रथम भगवान शंकरासाठी प्रदोष  व्रत करावे. यानंतर विधिनुसार भगवान शंकराची पूजा करावी. प्रदोष व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसा झोपू नये आणि दिवसभर ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करत राहावे. यानंतर संध्याकाळी प्रदोषाची विशेष शिवपूजा करण्यापूर्वी पुन्हा एकदा स्नान करावे. संध्याकाळी विधिनुसार भगवान शंकराची पूजा करताना प्रदोष व्रताची कथा पाठ करून आरती करावी. प्रदोष व्रताच्या पूजेनंतर जास्तीत जास्त लोकांना प्रसाद वाटून स्वतः सेवन करा.

 

प्रदोष व्रत 2022 च्या आगामी तारखा

  1. 08 सप्टेंबर 2022, गुरुवार – गुरु प्रदोष व्रत
  2. 23 सप्टेंबर 2022, शुक्रवार – शुक्र प्रदोष व्रत
  3. 07 ऑक्टोबर 2022, शुक्रवार – शुक्र प्रदोष व्रत
  4. 22 ऑक्टोबर 2022, शनिवार – शनि प्रदोष व्रत
  5. 05 नोव्हेंबर 2022, शनिवार – शनि प्रदोष व्रत
  6. 21 नोव्हेंबर 2022, सोमवार – सोम प्रदोष व्रत
  7. 05 डिसेंबर 2022, सोमवार – सोम प्रदोष व्रत
  8. 21 डिसेंबर 2022, बुधवार – बुध प्रदोष व्रत

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)