IIT बाबाचं अंधाऱ्या रात्री गंगेच्या किनारी तंत्रमंत्र?; ‘त्या’ सीक्रेट डायरीचं उलगडलं रहस्य

| Updated on: Jan 21, 2025 | 3:23 PM

कुंभमेळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या IIT बाबाने रात्री उशीरा संगमाच्या काठावर बसून तंत्र मंत्र करताना दिसले. त्यात त्यांनी कर्म आणि प्रारब्धापासून मोह आणि भ्रम, तसेच पुनर्जन्म आणि मुक्ती अशा विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी त्याच्या डायरीबद्दल सांगितले.

IIT बाबाचं अंधाऱ्या रात्री गंगेच्या किनारी तंत्रमंत्र?; त्या सीक्रेट डायरीचं उलगडलं रहस्य
iit baba abhay singh
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रयागराज मधील सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात अनेक साधू बाबा खूप चर्चेत आहेत. त्यातीलच या कुंभमेळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आयआयटी बाबाचे निश्चित ठिकाण नाही. जुना आखाड्यातून हकालपट्टी झाल्यानंतर प्रत्येक वेळी ते नव्या ठिकाणी सापडतात. यावेळी अभय सिंह नावाने ओळखले जाणारे आयआयटी बाबा रात्री उशीरापर्यंत गंगेच्या संगमाजवळ अनुष्ठान पुजा करताना दिसले. यावेळी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना एवढ्या रात्री या संगमाजवळ साधना करताना भक्तीचा कोणता मार्ग शोधतात हे सांगितले असून त्यांनी यावेळी त्यांच्या डायरीतील गुपित देखील उघडलं आहे.

संगमाजवळ रात्री उपासना करताना दिसले IIT बाबा

कुंभमेळ्यात IIT बाबा यांची प्रचंड चर्चा सुरु आहे. अशातच त्यांना रात्री उशिरापर्यंत उपासना आणि साधना करताना दिसले आहे. तर यावेळी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, एवढ्या रात्री उपासना करणे ही एक संतुलित ऊर्जा आहे, विश्वाचा समतोल आहे. ज्यात उपासना साधना करताना तयार होणारी ऊर्जा ही विश्वाच्या वर जाण्यासाठी आणि एक खाली जाण्यासाठी असते. जर मी यातून विश्वाशी ताळमेळ साधला तर विश्वाची ऊर्जाही जुळून येईल. अशातच नवीन काही शिकण्यासाठी येथे आल्याचे त्यांनी सांगितले असून आयुष्याचे सत्य जाणून घेण्यासाठी याचा अभ्यास करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

तसेच विश्वाची ऊर्जा जुळून येण्यासाठी आपण फक्त त्यासाठी ध्यान करू शकतो. अशावेळी ध्यान करताना ऊर्जा निर्माण करताना बाजूला एक अगरबत्ती लावावी आणि मग ऊर्जेनुसार दिवे लावावे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

लोकांना भविष्याची चिंता असते का? मुलाखती दरम्यान असा प्रश्न विचारला असता, यावर IIT बाबा म्हणजे अभय यांनी उत्तर दिले की, भविष्याची चिंता करणे योग्य नाही, परंतु तुम्ही त्याबद्दल विचार करू शकता आणि त्यापद्धतीने नियोजन करू शकता. चिंता हा शब्द वेगळा आहे; याचा अर्थ टेन्शनमध्ये राहणे. तसेच यात त्यांनी सल्ला देखील दिला की भविष्यात अडकून पडू नये. सध्याचा प्रत्येक क्षण १०० टक्के जगला पाहिजे कारण त्यानुसार तुमच्या पुढील गोष्टी घडतील.

डायरीचे गुपित उघडलं

IIT बाबांनी मुलाखतीत स्वतः त्यांची डायरी दाखवत त्यात काय काय लिहिले आहे हे दाखवत त्यांनी त्यात ओळख लिहून ठेवली आहे हे सांगितले. विश्वाची निर्मिती आणि अध्यात्म काय आहे हे या डायरीत समजावून सांगितले असून पुराणच्या माहिती द्वारे आणि गणितानुसार याचे स्पष्टीकरण दिले आहे. अध्यात्म एकच असताना त्यांचे भाग का पडले? इच्छा आणि वासना ही मूळ कारणे असल्याचेही देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. हे सगळे लिहिण्याआधी त्यांना ध्यान करावं लागतं असल्याचं स्पष्ट केले आहे.

मी साधू संत नाही

दरम्यान महाकुंभ मेळ्यात IIT वाले बाबा म्हणून ओळख निर्माण झालेल्या अभय यांनी हिंदी वृत्तवाहिनीशो बोलताना ते कुंभमेळ्यात फक्त शिकण्यासाठी आणि नवीन अनुभव घेण्यासाठी आले आहेत. ते कुठल्याही पंथाशी, आखाड्याशी संबंधित नाहीत. त्यांनी कोणत्याही महाराजांकडून दीक्षाही घेतलेली नाही. मी साधू-संत नाही, मला फक्त आयुष्याचे सत्य जाणून घ्यायचे आहे, म्हणून इथे आलोय, असं सांगतात.