Puja Vidhi: ..म्हणून पूजेत वापरतात विड्याचे पान; प्रत्येकाला माहिती असावी ‘ही’ माहिती

| Updated on: Jul 02, 2022 | 11:30 AM

हिंदू धर्मात पूजेदरम्यान (Puja vidhi) विशेष प्रकारची सामग्री वापरली जाते. यापैकी एक म्हणजे विड्याचे पान (betel leaf) . हिंदू धर्मात वापरल्या जाणार्‍या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवाचा आशीर्वाद प्राप्त करणे आहे, ज्यामध्ये विड्याचे पान खूप प्रभावी आहेत. वास्तुशास्त्रात विडयाच्या पानांशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने माणसाच्या जीवनातील पैशाची कमतरता दूर होते […]

Puja Vidhi: ..म्हणून पूजेत वापरतात विड्याचे पान; प्रत्येकाला माहिती असावी ही माहिती
Follow us on

हिंदू धर्मात पूजेदरम्यान (Puja vidhi) विशेष प्रकारची सामग्री वापरली जाते. यापैकी एक म्हणजे विड्याचे पान (betel leaf) . हिंदू धर्मात वापरल्या जाणार्‍या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवाचा आशीर्वाद प्राप्त करणे आहे, ज्यामध्ये विड्याचे पान खूप प्रभावी आहेत. वास्तुशास्त्रात विडयाच्या पानांशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने माणसाच्या जीवनातील पैशाची कमतरता दूर होते आणि समस्याही संपतात. विड्याच्या पानाशी संबंधित असे काही उपाय आहेत, ज्याचे धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व सांगण्यात आले आहे. हनुमानाला विड्याचे पान प्रिय आहे. असे म्हणतात की मंगळवारी किंवा शनिवारी आंघोळ केल्यावर हनुमान मंदिरात जाऊन पान अर्पण केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते की, पान अर्पण केल्याने हनुमानजी आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांना प्रत्येक संकटातून मुक्त करतात.

असे म्हणतात की, भगवान शंकराला विड्याचे पान अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. मुख्यतः श्रावण महिन्यातील किंवा सोमवारी गुलकंद, सुपारीचे पूड, बडीशेप यांचे पान भगवान शंकराला अर्पण करावे.

जर एखाद्यवर कला जादू करण्यात आला असेल तर त्याने शनिवारी सकाळी 5 पिंपळाची पाने आणि 8 विड्याची पाने घेऊन ती एका धाग्यात बांधावी. यानंतर वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार सलग पाच शनिवार घराच्या पूर्व दिशेला बांधावे, यामुळे दुकानात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पान सुकल्यानंतर नदी किंवा तलावात विसर्जित करावी.

हे सुद्धा वाचा

पौराणिक कथा

समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले.

थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देव देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)