पुणे : गणेशोत्सवाला गणेश चतुर्थीपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. हा सण 19 सप्टेंबर 2021 म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार आहे. या 10 दिवसांसाठी गणपतीची पूजा केली जाते. हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सवाचे दहा दिवस आता संपायला आले आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळाच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन होणार आहे.
उद्या सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात होणार आहे. नागरिकांना विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे.
कधी कुठल्या गणपतीचे विसर्जन?
ग्रामदैवत कसबा गणपती सार्वजनिक मंडळ : सकाळी 11 वाजता
ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ : सकाळी 11 वाजून 45 मिनीट
गुरुजी तालीम गणपती मंडळ : दुपारी 12 वाजून 30 मिनीट
तुळशीबाग गणपती मंडळ : दुपारी 1 वाजून 15 मिनीट
केसरीवाडा गणपती मंडळ : दुपारी 2 वाजता
श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ : दुपारी 2 वाजून 45 मिनीट
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : सायंकाळी 6 वाजून 36 मिनीट
अखिल मंडई गणपती मंडळ : सायंकाळी 6 वाजून 30 मिनीट
पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनाला सकाळी दहा वाजल्यापासूनच मंडपातच विसर्जन होणार आहे. नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर न पडता विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहण्यावरच भर द्यावा, असे आवाहान पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केलंय.
गृहरक्षक दल जवान – 450
दंगल नियंत्रण पथके – 10
राज्य राखीव पोलिस दल – 10 प्लाटुन
बॉम्ब शोधक व नाशक पथके – 08
शीघ्र कृती दल पथके – 16
मुख्यालयाकडून पोलिस ठाण्यासाठीचे मनुष्यबळ – 1100
गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके – 20
पोलिस मुख्यालयातील राखीव तुकड्या – 05
पोलिस ठाण्यांकडील पोलिस मित्र – 1 हजार
वज्र, लिमा, वरूण यांचा राखीव बंदोबस्त
बाप्पा पावला! वसईत विसर्जन करताना साडेपाच तोळे सोन्याचे बाशिंग हरवले; 12 तासानंतर सापडलेhttps://t.co/RcWO6aKSev#ganeshimmersion | #GaneshChaturthi2021 | #GaneshChaturthi | #vasai
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 14, 2021
संबंधित बातम्या :
Ganesh Visarjan | पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, 173 ठिकाणी कृत्रिम तलाव