मुंबई, हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी व्रत असतात. विधी आणि नियमांनुसार या व्रताचे पालन केल्यास भक्तांना शुभ फळ प्राप्त होतात. नवीन वर्ष 2023 ची सुरुवात एकादशी तिथीने होत आहे. पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi 2023) व्रत 2 जानेवारीलाच आहे आणि ही एकादशी तिथी 1 जानेवारीच्या संध्याकाळपासून सुरू होईल. हिंदू कॅलेंडरनुसार, पुत्रदा एकादशी हे एकमेव एकादशीचे व्रत आहे जे वर्षातून दोनदा येते. पहिल्या पुत्रदा एकादशीचे व्रत पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला, तर दुसऱ्या पुत्रदा एकादशीचे व्रत सावन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते.
पौष पुत्रदा एकादशीचे व्रत आज 2 जानेवारी 2023 रोजी आहे. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. पौष पुत्रदा एकादशी व्रत केल्याने वाजपेयी यज्ञाप्रमाणे पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ज्यांना मूल होत नाही त्यांनी हे व्रत अवश्य करावे अशी पौराणिक मान्यता आहे.
पौष पुत्रदा एकादशी सोमवार, 2 जानेवारी 2023 रोजी
पाराण वेळ 3 जानेवारी – सकाळी 07:14 ते 09:19
पारणाच्या दिवशी द्वादशी समाप्ती वेळ – रात्री 10:01 वा
एकादशी तिथी सुरू होते – 01 जानेवारी 2023 संध्याकाळी 07:11 वाजता
एकादशी तिथी समाप्त – 02 जानेवारी 2023 रात्री 8.23 वाजता
हिंदू दिनदर्शीकेनुसार 02 जानेवारी 2023 रोजी पौष पुत्रदा एकादशीला तीन शुभ योग तयार होत आहेत. या काळात सिद्ध, साध्या, रवियोग निर्माण होत आहेत. या योगात उपासना केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)