ज्योतीषशास्त्रानुसार राहू ग्रहाला छाया ग्रह असे म्हटले जाते. छाया ग्रहचा अर्थ ते ग्रह नसूनही एखाद्याला ते ग्रहा सारखे वाटते. राहूचा स्वभाव निर्दयी आणि क्रूर मानला जातो. मान्यतेनुसार, राहू प्रत्येक ८ महिन्यांनी आपले नक्षत्र बदलतो. २९ नक्षत्रांचे चेक्र पूर्ण करून परत पुन्हा येण्यासाठी १८ वर्ष लागतात. राहू ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम सर्व १२ राशींवर वेगवेगळा पाहायला मिळतो. राहू ग्रहाचे नाव घेतले तरी समोरचा माणूस घाबरतो. राहूचा परिणाम तुमच्या राशींवर त्यांच्या बदलानुसार असतो. २७ जानेवारी २०२५ रोजी राहू आणि शुक्र ग्रहाची युती होणार आहे. या ग्रहांच्या युतीमुळे नेमकं कोणत्या राशींना फायदे होणार आहे चला जाणून घेऊया.
सध्या राहू ग्रह उत्तरभाद्रपद नक्षत्रामध्ये स्थित आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३७ वाजता राक्षसांचा गगुरु म्हणजेच शुक्र देखील या नक्षत्रांमध्ये भ्रमण करणार आहे. यापूर्वी, २८ जानेवारी रोजी राहूची मीन राशीमध्ये शुक्राशी युती होणार आहे. या दोन्ही दुर्मिळ योगांमुळे काही राशींना प्रचंड फायदा होणार आहे. या राशींची आर्थिक स्थिती स्थिर होणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी.
शुक्र ग्रह उत्तरभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि या राशीत्या बाराव्या घरामध्ये राहिल. अशा परिस्थितीमध्ये या घरामध्ये राहूची युती होणार आहे. आशा परिस्थितीमध्ये मेष राशींच्या लोकांना याचा भरपूर लाभ होणार आहे. मेष राशींच्या लोकांवर शनिचा प्रभाव राहिल.
विवाहित लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांना सध्या असलेल्या आरोग्याच्या समस्या आता संपणार आहे. त्यासोबतच त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे. मेष राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद भरभरून येणार आहे. या वर्षामध्ये तुम्ही परदेशामध्ये प्रवास करू शकता. यावर्षी मेष राशींच्या लोकांना परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशीच्या लोकांवर या वर्षामध्ये राहूच्या आशिर्वादाचा वर्षाव होणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी पुढचा महिना खूप फायदेशीर ठरू शकतो. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाऊ शकतो. तुमचा बॉस तुमच्यावर खुश राहिल आणि तुमची कामामध्ये प्रगती होईल. राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांना मोठी पद मिळण्याची शक्यता आहे. न्यायाल्यामध्ये चालू असलेले तुमचे खटले तुमच्या बाजूने निकाल देऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांसाठी राहू आणि शुक्र ग्रहाची युती कुंडलीच्या तिसऱ्या घरमध्ये होणार आहे. तुमच्या मेहनचीचे फळ आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. स्पर्धा परिक्षाची तयारी करत असलेल्या लोकांच्या आयुष्यामध्ये यश मिळणार आहे. तुमचा प्रभावशाली लोकांसोबत संपर्क वाढू शकतो ज्यामुळे तुम्हाला फायदे होणार आहेत. तुमच्या कुटुंबामध्ये एकता राहाणार आहे. तुम्ही कुटुंबियांसह एका छोट्या सहलीला जाऊ शकता.