Raksha bandhan 2022: कधी आहे रक्षा बंधन? मुहूर्त आणि राखी बांधण्यामागचे शास्त्र

| Updated on: Jul 04, 2022 | 1:50 PM

हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात, मात्र भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचे (Raksha Bandhan 2022) वेगळेच महत्त्व आहे. रक्षाबंधन (Raksha Bandhan) हे भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, हा सण दरवर्षी श्रावण (Sharawan 2022) महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधते  आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तसेच […]

Raksha bandhan 2022: कधी आहे रक्षा बंधन? मुहूर्त आणि राखी बांधण्यामागचे शास्त्र
Follow us on

हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात, मात्र भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचे (Raksha Bandhan 2022) वेगळेच महत्त्व आहे. रक्षाबंधन (Raksha Bandhan) हे भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, हा सण दरवर्षी श्रावण (Sharawan 2022) महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधते  आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तसेच भाऊसुद्धा बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा’, (Kajri pournima) पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा(Narali pournima 2022) या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे. बऱ्याचदा बहीण मोठी असते, ती आपल्या भावाचे रक्षण करते, ती स्वतःचे रक्षण करण्यासाठीही समर्थ असते. पण स्त्री कितीही कमावती, मोठी असली तरीही तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास या राखीमधून दिसून येतो. यामध्ये तिचा दुबळेपणा नाही तर तिचा तिच्या भावाच्या कतृत्त्वावर जास्त विश्वास असतो आणि हेच त्यांच्या नात्यातील आपलेपण जपण्यासाठी राखीपौर्णिमा साजरी करण्यात येते.

जाणून घ्या रक्षाबंधन कधी आहे?

हिंदू दिनदर्शिकेनुसार, या वर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा गुरुवार, 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होत आहे, आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 वाजता समाप्त होईल.  यावर्षी 11 ऑगस्ट 2022 रोजी भाऊ-बहिणीचा पवित्र सण रक्षाबंधन साजरा होणार आहे.

रक्षाबंधनाचा मुहूर्त

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 09.28 ते रात्री 09.14 पर्यंत असेल. यावेळात तुम्ही राखी बांधू शकता.

हे सुद्धा वाचा

 

रक्षा बंधनामागचे शास्त्र

राखी हातावर बांधण्यामागे शास्त्र सांगण्यात आले आहे. आपल्याकडे भारतीय परंपरेत अनेक शास्त्रे सांगितली जातात. सणवार साजरी करण्यामागे  भावनांप्रमाणे शास्त्रेही असतात. त्यापैकीच हे एक शास्त्र आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते. यमलहरी या पुरूषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतीमान होतात असा समज आहे. त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की, सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो. पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे मानले जाते. त्यामुळे एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करते असे शास्त्र सांगते. राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिण करते असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)