सांगली : आयोध्या नगरीमध्ये गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या राम मंदिर (Ram Mandir In Maharashtra) 22 जानेवारी रोजी भाविकांच्या साठी खुले केले जाणार आहे या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि राम मंदिर पाहण्याचा आनंद हा सांगली जिल्ह्यातील राम भक्तांना मिळावा यासाठी मिरज तालुका क्रीडा संकुल येथे राम मंदिराची भव्य प्रतीकती उभारण्याचे काम सुरू आहे 65 फूट उंच, 150 फूट लांबी आणि 120 फूट रुंदीचे भव्य राम मंदिराची प्रतिकृती उभारली जाणार आहे यांचे भूमी पूजन सोहळा पार पडला. या ठिकाणी मंदीर लोकार्पण सोहळ्या निमित्त 21 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
21 जानेवारी रोजी श्री रामाच्या मूर्तीची शोभा यात्रा काढण्यात येणार आहे तर 22 तारखेला ही राम मंदिराची प्रतिकृती जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे. श्रीरामची मूर्ती स्थापना, धार्मिक विधी पूजाअर्चा, गीत रामायण कार्यक्रम यावेळी पार पडणार आहे राम मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध स्पर्धा त्याचबरोबर नृत्य ,भजन, ,भावगीते आणि एक दिवस राम नामाचा जप असे विविध भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
22 जानेवारी 2024 तारखेला अयोध्येत राम मंदिर उद्धाटनाची तयारी जोरात सुरू आहे. मंदिर परिसर आणि संपूर्ण अयोध्या नगरीत भाविकांनी आतापासूनच गर्दी करायला सुरूवात केली आहे. भव्य समारंभाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडून अनेक व्हिआयपीला निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अथिती पंतप्रधान मोदी राहाणार आहे.