Ram mandir : राम मंदिर सोहळ्याची जय्यत तयारी, एका मिनीटात होणार शंभर भाविकांचे दर्शन

| Updated on: Dec 28, 2023 | 2:35 PM

रामललाची प्राण प्रतिष्ठापना जरी 22 जानेवारी होणार असली तरी मंदिराचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ते प्रगती पथावर आहे. मंदिरावर कळस लावण्याचं कामं सुरू आहे. कारागीर रात्रंदिवस हे काम करत आहेत. मंदिर परिसरात अजूनही सात ते आठ क्रेन आहेत. देशातील वेगवेगळ्या भागातून आलेले कामगार आपल्या पूर्ण क्षमतेने काम करत आहेत.

Ram mandir : राम मंदिर सोहळ्याची जय्यत तयारी, एका मिनीटात होणार शंभर भाविकांचे दर्शन
राम मंदिर अयोध्या
Image Credit source: Social Media
Follow us on

संदिप राजगोळकर, अयोध्या : कोट्यावधी राम भक्तांचे स्वप्न असेले राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya) स्वप्न अखेर साकार झाले आहे. अयोध्येत श्री रामाचे भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग आला आहे. येत्या 22 जानेवारी 2024 ला या मंदिरात श्री रामाचे बाल रूप रामलालाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराचे दृश्य टिव्ही 9 मराठीच्या कॅमेरात टिपले आहे. अतिशय भव्य असे हे राम मंदिर भाविकांसाठी 22 जानेवारी 2024 पासून खुले होणार आहे. सकाळी 11 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष विमान अयोध्येच्या श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. त्यानंत पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळ आणि रेल्वे स्थानक या दोघांचेही उद्धाटन केले जाईल.

मंदिर बांधकामाचे काम युद्ध पातळीवर सुरू

रामललाची प्राण प्रतिष्ठापना जरी 22 जानेवारी होणार असली तरी मंदिराचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मंदिरावर कळस लावण्याचं कामं सुरू आहे. कारागीर रात्रंदिवस हे काम करत आहेत. मंदिर परिसरात अजूनही सात ते आठ क्रेन आहेत. देशातील वेगवेगळ्या भागातून आलेले कामगार आपल्या पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. सध्या उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी आहे. धूकंही पडत आहे त्यामुळे कामगारांना काम करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मात्र रात्रीच्या वेळी लाईट लावून प्रचंड थंडीतही काम अविरत सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

असे आहेत मंदिराचे वैशिष्ट्ये

अयोध्येत साकारले जात असलेले राम मंदिर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तब्बल 70 एकर इतकी मोठी मंदिर परिसराचा ही जागा आहे. त्यात 30 टक्के बांधकाम झालेले आहे. मंदिराचं प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला बनवण्यात आलं आहे. दर्शन घेतल्यानंतर दक्षिणेकडून भाविक बाहेर पडतील अशी सुविधा करण्यात आली आहे. मंदिराच्या चारही कोपऱ्यांमध्ये सूर्य, शंख, चक्र आणि भगवती यांचं मंदिर असणार आहे. जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन रॅम्प असणार आहे. याशिवाय लिफ्टचीही व्यावस्था करण्यात आली आहे. येत्या काळामध्ये तब्बल 25 हजार भाविकांची व्यावस्था या मंदिरात करण्यात येणार आहे.  असे हे भव्य मंदिर जगभरात प्रसिद्ध असेल यात शंका नाही.