अयोध्या : उद्या राम नगरी अयोध्यामध्ये (Ayodhya invitation) भव्य राम मंदिराचा उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. संपूर्ण शहराला फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी हजारो मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. निमंत्रीत केले गेलेले मान्यवरही या सोहळ्याला येण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. या सोहळ्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. हे निमंत्रण देण्यासाठी मंदिर प्रशासनाने काही निकष ठरविले होते. त्यानुसार या मान्यवरांना निमंत्रीत केले गेले. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 6 हजारांपेक्षा जास्त व्हीव्हीआयपी उद्या अयोध्येच्या या सोहळ्यासाठी उपस्थिती लावू शकतात.
रामजन्मभूमी ट्रस्टने निवडणूक आयोगाकडून यादी घेऊन देशातील नोंदणीकृत पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना निमंत्रणे आली आहेत. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून निमंत्रण आले आहे, तर अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून. त्याच न्यायाने राष्ट्रवादीच्या दुसर्या गटाचे प्रमुख म्हणून शरद पवार, वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर इत्यादी नेत्यांना निमंत्रण
क्रिकेट, सिनेमा, उद्योग इत्यादी क्षेत्रातील सेलिब्रिटीज यांनासुद्धा निमंत्रण पाठवण्यात आले.
देशातील कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही. केवळ राजशिष्टाचाराचा भाग म्हणून उत्तरप्रदेशात कार्यक्रम होत असल्याने तेथील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निमंत्रण. भाजपाचे निमंत्रण हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांना. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष यांना निमंत्रण नाही. याशिवाय, 8000 निमंत्रितांमध्ये मोठा घटक हा देशभरातील संत-महंत यांचा आहे . महाराष्ट्रातून अशा 409 संत-महतांना निमंत्रण पाठवण्यात आले.