Ram Mandir : राम मंदिराचा सोहळा नेमका कसा असणार? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

| Updated on: Jan 09, 2024 | 9:47 AM

राम मंदिराचे बांधकाम हे नगारा शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर 380 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच असेल आणि भव्यपणे उभे असेल. त्याचा प्रत्येक दगड, प्रत्येक खांब, प्रत्येक कारागिरी हे भगवान रामाच्या भक्तीचे प्रतीक आहे. मंदिरात 392 खांब आणि 44 दरवाजे असतील, ज्यामुळे प्राचीन मंदिरांची प्रतिमा अनुभवता येईल.

Ram Mandir : राम मंदिराचा सोहळा नेमका कसा असणार? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर
राम मंदिर
Image Credit source: Social media
Follow us on

अयोध्या : भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अनेक दशकांच्या संघर्ष, समर्पण आणि प्रतिक्षेनंतर भव्य राम मंदिराचा अभिषेक सोहळा (Ram Mandir) होणार आहे. हा सोहळा नेमका कसा असणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच असेल. कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या सोहळ्याचे सर्व अपडेटस् tv9 मराठी तुमच्यापर्यंच वेळोवेळी पोहचवत आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या कार्यक्रमाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा एक दिव्य अनुभव असेल, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल. प्राचीन मंत्रोच्चार, भजन-कीर्तन, देवतांचा अभिषेक, मंदिर परिसरात दीपप्रज्वलन यामुळे सोहळ्याची आभा आणखी वाढेल. 1 लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती या सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन केव्हा आणि कसे केले जाईल?

22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12:20 वाजता सोहळ्याची शुभ वेळ निश्चित करण्यात आली आहे. पाच दिवसीय धार्मिक विधींच्या पवित्र मालिकेनंतर हा प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम असेल. 51 वैदिक पंडित विधी करतील, जे मंत्रोच्चार आणि यज्ञ करून दिव्य वातावरण निर्मिती करतील.

पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे असतील

या ऐतिहासिक सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोबतच राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे राष्ट्रीय महत्त्व दर्शवते. त्यांच्याशिवाय धार्मिक नेते, संत, राजकीय व्यक्ती, चित्रपट तारे आणि मान्यवरांचाही मेळावा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मंदिर बांधणीची कलात्मकता: प्रेरणादायी वास्तुकला

राम मंदिराचे बांधकाम हे नगारा शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर 380 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच असेल आणि भव्यपणे उभे असेल. त्याचा प्रत्येक दगड, प्रत्येक खांब, प्रत्येक कारागिरी हे भगवान रामाच्या भक्तीचे प्रतीक आहे. मंदिरात 392 खांब आणि 44 दरवाजे असतील, ज्यामुळे प्राचीन मंदिरांची प्रतिमा अनुभवता येईल.

राम मंदिर उद्घाटन सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. प्रतीक्षेचे तास संपणार आहेत आणि विश्वासाचा प्रकाश अधिक उजळणार आहे. जर तुम्हाला या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा बहुमान मिळवायचा असेल, तर तयारीला लागा आणि या ऐतिहासिक क्षणाचा एक भाग व्हा.