प्राण प्रतिष्ठापणेआधी मूर्तीचा चेहरा का झाकलेला असतो? काय आहे यामागचे रहस्य?

| Updated on: Jan 09, 2024 | 2:06 PM

जेव्हा भक्त देवाकडे पाहतो तेव्हा तो फक्त त्याच्या डोळ्यात पाहतो, कारण डोळे हे उर्जेचे मुख्य केंद्र आहे. तिथून भावनांची देवाणघेवाण होते. बांके बिहारींसाठीही असे म्हटले जाते की, भक्तांनी त्यांच्या डोळ्यात जास्त वेळ पाहू नये म्हणून गर्भगृहाचा पडदा पुन्हा पुन्हा बंद केला जातो. कारण एकदा एका भक्ताने 30 सेकंद इतक्या प्रेमाने भगवंतांच्या डोळ्यात पाहिले की श्रीकृष्ण त्याच्यावर प्रभाव टाकून भक्तासह निघून गेले.

प्राण प्रतिष्ठापणेआधी मूर्तीचा चेहरा का झाकलेला असतो? काय आहे यामागचे रहस्य?
रामलला
Image Credit source: Social Media
Follow us on

अयोध्या : रामनगरी अयोध्येतील प्रभू राम जन्मस्थानी नव्याने बांधलेल्या भव्य मंदिरात रामललाच्या (Ramlala) मूर्तीचा अभिषेक 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. अभिषेकासाठी निवडलेली मूर्ती चर्चेचा विषय ठरत आहे. जोपर्यंत प्राणप्रतिष्ठापणा होणार नाही तोपर्यंत या मूर्तीचे रूप समोर येणार नाही. रामललाचा चेहरा झाकलेला असणार आहे. प्राण प्रतिष्ठापणेनंतर रामललाच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. प्राणप्रतिष्ठापणेच्याआधी मूर्तीचा चेहरा झाकलेला किवा डोळ्यावर पट्टी का बांधलेली असते याचे कारण आपण जाणून घेणार आहोत.

श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, 17 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापूर्वी मूर्तीचे अनावरण केले जाणार आहे. या दिवशी राम भक्तांना रामाच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. त्यासाठी अयोध्येत नगर यात्राही काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी मूर्तीचा फोटो आणि व्हिडिओ सर्वसामान्यांसाठी प्रसिद्ध केला जाईल. प्रभू रामाची मूर्ती मिरवणूकीसाठी आल्यावर त्यांचे डोळे भक्तांना दिसणार नाहीत कारण रामाच्या मूर्तीचे डोळे कापडाच्या पट्टीने झाकलेले आहेत.

मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी का बांधली जाते?

ज्योतिषांच्या मते, जेव्हा भक्त देवाकडे पाहतो तेव्हा तो फक्त त्याच्या डोळ्यात पाहतो, कारण डोळे हे उर्जेचे मुख्य केंद्र आहे. तिथून भावनांची देवाणघेवाण होते. बांके बिहारींसाठीही असे म्हटले जाते की, भक्तांनी त्यांच्या डोळ्यात जास्त वेळ पाहू नये म्हणून गर्भगृहाचा पडदा पुन्हा पुन्हा बंद केला जातो. कारण एकदा एका भक्ताने 30 सेकंद इतक्या प्रेमाने भगवंतांच्या डोळ्यात पाहिले की श्रीकृष्ण त्याच्यावर प्रभाव टाकून भक्तासह निघून गेले.

हे सुद्धा वाचा

म्हणजे देवाची मूर्तीत डोळे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे प्राण-प्रतिष्ठेनंतरच डोळे उघडतात. देवाच्या मूर्तीच्या डोळ्यात पाहिल्यास ऊर्जा, सकारात्मकता आणि आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळते. त्यामुळे नगरप्रदक्षिणा करताना मूर्तीचे डोळे झाकलेले असतात. याचं कारणामुळे रामललाच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आहे.

जाणून घ्या रामललाची मूर्ती का आहे खास?

रामललाची मूर्ती खास आहे. नेपाळच्या नारायणी नदीतून शालिग्राम खडक आणून त्यावर कोरीव काम करून ही मूर्ती तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शालिग्राम हे भगवान विष्णूचे मूर्ती स्वरूप आहे आणि भगवान राम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. या दृष्टीकोनातून पाहिले असता, नारायणाच्या मूर्तीचे कोरीव काम करून, भगवान रामाच्या बालस्वरूपाची मूर्ती बनवली गेली आहे, जी अत्यंत पवित्र आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)