Beed : परळीत तीन वर्णनाचे राम मंदिर, किती दिवस चालतो राम जन्मोत्सव वाचा!

| Updated on: Apr 10, 2022 | 12:08 PM

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या परळी (Parli) नगरीत धार्मिक वैशिष्ट्य असलेले अनेक मंदिरे (Temples) आहेत. जुन्या गावभागात रामाचे वेगवेगळे वर्णन असलेले काळाराम, गोराराम व सावळाराम ही पुरातन मंदिरे आहेत. रामनवमीच्या दिवशी किर्तन, रामजन्मोत्सवाबरोबरच पुढील तीन दिवस तिन्ही मंदिराच्या पालख्या काढण्याची परंपरा आहे.

Beed : परळीत तीन वर्णनाचे राम मंदिर, किती दिवस चालतो राम जन्मोत्सव वाचा!
परळीमध्ये राम जन्मोत्सव सुरूवात.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या परळी (Parli) नगरीत धार्मिक वैशिष्ट्य असलेले अनेक मंदिरे (Temples) आहेत. जुन्या गावभागात रामाचे वेगवेगळे वर्णन असलेले काळाराम, गोराराम व सावळाराम ही पुरातन मंदिरे आहेत. रामनवमीच्या दिवशी किर्तन, रामजन्मोत्सवाबरोबरच पुढील तीन दिवस तिन्ही मंदिराच्या पालख्या काढण्याची परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्ष खंडीत झालेली परळीतील रामजन्मोत्सवाची (Ram Navami) परंपरा यावर्षी मोठ्या उत्साहात होत आहे.

350 वर्षापुर्वी नाशिक येथुन या मुर्ती आणत स्थापना केली

परळीतील अंबेवेस येथे शहरातील सर्वात जुने काळाराम मंदिर असुन या मंदिरात राम, सिता आणि लक्ष्मणाच्या वेगवेगळ्या तीन मुर्ती आहेत. 350 वर्षापुर्वी नाशिक येथुन या मुर्ती आणत स्थापना केलेली आहे. या मंदिराचे जुने बांधकाम पाडुन बाजीराव धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने नविन मंदिर व भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. गणेशपार येथे गोराराम मंदिर असुन या मंदिरातील मारुतीची मूर्ती समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः स्थापन केलेली आहे. समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी यांनी अयोध्येतुन आणलेल्या रामाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या राम मंदिरामध्ये मागील तीनशे वर्षांपासून रामनवमीचा उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात येतो.

रामायणाचे पारायण 9 दिवस सुरू

रामायणाचे पारायण या 9 दिवसांमध्ये करण्यात येते. रामदास बुवा रामदासी यांचे बंधू लक्ष्मण बुवा रामदासी, नंदकुमार रामदासी व रामदासी कुटुंबाकडे या मंदिराची व्यवस्था व पुजा आहे. रामरक्षा पहिल्या श्लोकाप्रमाणे तीनशे वर्षापुर्वी संन्याशी असलेल्या वामन जोशी यांनी या राममंदिरातील मुर्तीची स्थापना केली आहे. रामाच्या डाव्या मांडीवर सिता व समोर हनुमान अशी आकर्षक मुर्ती आहे. या मंदिराची व्यवस्था रामभाऊ जोशी, रविंद्र जोशी, विजय जोशी, प्रमोद जोशी यांच्याकडे परंपरेप्रमाणे आहे.

परळीतील तिन्ही राममंदिरांच्या मुर्तींचे वैशिष्ट्य वेगवेगळे

परळीतील तिन्ही राममंदिरातील मुर्तींचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे. काळ्या पाषाणापासुन बनलेल्या राम, सिता व लक्ष्मणाच्या मुर्तीवरुन अंबेवेस येथील मंदिरास काळाराम, गणेशपार येथील मंदिरात पंचधातुची राममुर्ती असल्याने गोराराम तर गणेशपार- नांदुरवेस रस्त्यावरील रामाची मुर्ती पाषाणाची असल्याने या मंदिरास सावळाराम मंदिर असे नाव पडले आहे. तिन्ही राममंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रामनवमीनंतर दशमीच्या दिवशी काळाराम मंदिराची,एकादशी दिवशी गोराराम मंदिराची तर द्वादशी दिवशी सावळाराम मंदिराची पालखी जुन्या परळीतुन काढण्यात येते.

संबंधित बातम्या : 

Ram Navami 2022 : जय श्रीराम! जाणून घ्या राम नवमीचे महत्त्व , पूजा विधी

Navratri 2022 : नवरात्रीत असा करा हवन, जाणून घ्या शुभ वेळ आणि साहित्य