मुंबई : आज राम नवमी (Ram Navmi) हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम (Ram) यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमीला हा हिंदूंचा प्रमुख उत्सव राम नवमी म्हणून साजरा केला जातो.भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी दिवशी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क (Karak Rashi)राशीत झाला. रामनवमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार, भगवान श्रीरामाच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. राम नवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. यंदा राम नवमी 10 एप्रिलला येत आहे. हा दिवस भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान राम यांचा जन्म म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या मुलाच्या रुपात भगवान विष्णूचा अवतार म्हणून रामाचा जन्म साजरा केला जातो.
नवमी तारीख 10 एप्रिल रोजी सकाळी 12:43 वाजता प्रारंभ होईल आणि 22 एप्रिल रोजी दुपारी 12:35 वाजता समाप्त होईल
भगवान राम यांचा जन्म सूर्यवंशी इक्ष्वाकु वंशमध्ये त्रेता युगात राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचा पुत्र म्हणून अयोध्येत झाला होता. त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तारखेला झाला होता. हिंदू शास्त्रानुसार राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. म्हणून हा उत्सव देशभरातील हिंदूंमध्ये धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो.
राम नवमीचा मुहूर्त चैत्र शुक्ल नवमी तिथी सुरू होते – 10 एप्रिल, दिवस रविवार, 01:23 सकाळी
चैत्र शुक्ल नवमी तिथी समाप्त होते – 11 एप्रिल, सोमवार, 03:15 am
राम जन्मोत्सवाची शुभ मुहूर्त – सकाळी 11:06 ते दुपारी 01:39 पर्यंत
सुकर्मा योग रामनवमीच्या दिवशी दुपारी १२:०४ , पुष्य नक्षत्र राम नवमीला पूर्ण रात्रीपर्यंत.
रामनवमीच्या दिवशी विजय मुहूर्त – दुपारी 02:30 – 03:21 PM
रामनवमी दिवशी अमृत काल – 11:50 PM – 01:35 PM राहुकाल राम नवमीच्या
संबंधीत बातम्या
Zodiac | गुरू देणार आयुष्याला दिशा, 12 वर्षानी गुरू कराणार स्वामी राशीत प्रवेश
Chaita Navratri 2022 | चैत्र नवरात्रीत तुळजाभवानी मातेचे मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय
‘आई माऊलीचा उदो उदो’ जयघोषात एकविरा देवी उत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन