Ram Navmi 2023 : राम नवमीच्या दिवशी अवश्य करा हे उपाय, होतील सर्व समस्या दुर, वैवाहिक जिवन होईल समृद्ध

| Updated on: Mar 11, 2023 | 10:41 PM

हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमीला हा हिंदूंचा प्रमुख उत्सव राम नवमी म्हणून साजरा केला जातो.

Ram Navmi 2023 : राम नवमीच्या दिवशी अवश्य करा हे उपाय, होतील सर्व समस्या दुर, वैवाहिक जिवन होईल समृद्ध
राम नवमी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : रामनवमी, भगवान श्री राम यांच्या जयंतीचा (Ram Navami 2023) उत्सव, दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी ही तारीख 30 मार्च 2023, गुरुवार असेल. ज्योतिषांच्या मते, राम नवमी 29 मार्च 2023 रोजी रात्री 09:07 वाजता सुरू होत आहे, जी 30 मार्च 2023 रोजी रात्री 11:30 वाजता संपेल. या दिवशी काही उपाय केल्याने प्रभू श्रीरामाची कृपा प्राप्त होऊ शकते. या उपायांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

या उपायांनी होतील वैवाहिक जिवनातील समस्या दुर

1. रामनवमीच्या दिवशी खीर बनवा. ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशात ठेवा. आता ही खीर पती-पत्नीने मिळून खावी. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. दुरावा दूर होईल.

2. रामनवमीला एका भांड्यात पाणी घेऊन ‘ओम श्री हरीं रामचंद्राय श्री नमः’ या रामरक्षा मंत्राचा 108 वेळा जप करा. हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा. हा उपाय केल्याने वास्तू दोष दूर होण्यासोबतच नकारात्मक ऊर्जाही संपते.

हे सुद्धा वाचा

३. श्रीरामचंद्र कृपालु भजु मन अर्थात श्री राम स्तुती तीन वेळा वेगवेगळ्या वेळी भगवान श्रीरामाच्या मंदिरात किंवा रामनवमीला त्यांच्या चित्रासमोर पाठ करा. असे केल्याने माणसाचे दु:ख दूर होतात.

4. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाच्या भक्तांनी हनुमानजींची स्तुती करावी आणि हनुमान चालिसाचा पूर्ण पाठ करावा. हा उपाय केल्याने व्यक्तीवर श्रीराम आणि हनुमानजींची कृपा कायम राहते.

कधी साजरी होते राम नवमी

हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमीला हा हिंदूंचा प्रमुख उत्सव राम नवमी म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी दिवशी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क राशीत झाला. रामनवमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार, भगवान श्रीरामाच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. राम नवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)