मुंबई : रमजानचा महिना (Ramadan 2023) मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात पवित्र असतो. या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते. रमजानचा महिना कधी 29 दिवसांचा असतो तर कधी 30 दिवसांचा असतो. रमजान सुरू होताच मुस्लिम लोकं रोजा सुरू करतात. अरबी शब्दकोशात उपवासाला सौम म्हणतात, म्हणून या महिन्याला अरबीमध्ये माह-ए-सियाम असेही म्हणतात. फारसीमध्ये उपवासाला रोजा म्हणतात. यावर्षी हा पवित्र महिना 23 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. रमजानमध्ये रोजे ठेवणे प्रत्येक मुस्लिमासाठी अनिवार्य मानले जाते. रोजाची सुरुवात सकाळी सेहरीने होते आणि त्यानंतर संध्याकाळी इफ्तारने रोजा सोडला जातो. चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रमजान महिना सुरू होतो, असे मानले जाते. जर आज मक्केत चंद्र दिसला तर तो उद्यापासून सुरू होऊ शकतो. सेहरी आणि इफ्तारची नेमकी वेळ जाणून घेऊया.
सूर्योदयापूर्वी फजरच्या अजानने उपवास सुरू होतो. यावेळी सेहरी घेतली जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, रमजान महिन्यात सूर्योदयापूर्वी अन्न ग्रहण केले जाते. याला सहारी असे म्हणतात. सेहरीची वेळ आधीच ठरलेली असते.
दिवसभर खाण्यापिण्याशिवाय उपवास केल्यानंतर संध्याकाळी नमाज अदा केल्यावर खजूर खावून रोजा सोडला जातो. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होते आणि मगरिबची अजान झाल्यावर रोजा सोडला जातो. याला इफ्तार म्हणतात. यानंतर, एखादी व्यक्ती सकाळी सेहरीपूर्वी काहीही खाऊ शकते.
यावेळी रमजान महिना 30 दिवसांचा असेल. यावेळी शेवटचा रोजा 21 एप्रिलला असेल आणि त्यानुसार यंदा 22 एप्रिलला ईद साजरी केली जाईल. रमजान महिन्यात काही कठोर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. ते नियम काय आहेत जाणून घेऊया.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)