रामाचा वनवास 14 वर्षांचाच का होता? रामायणातील ही पौराणिक कथा आहे खुपच रंजक

| Updated on: May 08, 2023 | 8:38 PM

राजा दशरथाच्या लग्नापूर्वी कैकेयी महर्षी दुर्वासाची सेवा करत असे. कैकेयीच्या सेवेने प्रसन्न होऊन महर्षी दुर्वासांनी कैकेयीच्या एका हाताला वज्र बनवले. कालांतराने कैकेयीचा विवाह राजा दशरथशी झाला.

रामाचा वनवास 14 वर्षांचाच का होता? रामायणातील ही पौराणिक कथा आहे खुपच रंजक
रामायण
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : रामायण हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो. रामायणात (Ramayana Story) रामाच्या जीवनाचा उल्लेख आहे. रामायणाचा सार सर्वांनाच माहीत आहे, पण रामायणात अशा अनेक कथा आहेत. ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. यातील एक कथा राजा दशरथाची पत्नी कैकेयीला वरदान मिळाल्याशी संबंधित आहे. या वरदानामुळेच कैकेयीने भगवान रामाला 14 वर्षांच्या वनवासात पाठवले. कैकेयीचे तिचा मुलगा भरतवर खूप प्रेम होते. कैकयीला रामाकडूनही अनेक अपेक्षा होत्या, मग असे असताना  रामाला 14 वर्षांसाठी वनवासात का पाठवले असा प्रश्न पडतो. जाणून घेऊया यामागची एक पौराणिक कथा.

वचनांमध्ये अडकले राजा दशरथ?

राजा दशरथाच्या लग्नापूर्वी कैकेयी महर्षी दुर्वासाची सेवा करत असे. कैकेयीच्या सेवेने प्रसन्न होऊन महर्षी दुर्वासांनी कैकेयीच्या एका हाताला वज्र बनवले. कालांतराने कैकेयीचा विवाह राजा दशरथशी झाला. अनेक वर्षांनी स्वर्गात देवासुर युद्ध सुरू झाले. देवराज इंद्राने राजा दशरथ यांना मदतीसाठी बोलावले. महाराजांच्या रक्षणासाठी राणी कैकेयीही सारथी म्हणून देवासुर संग्रामात पोहोचली होती. युद्धादरम्यान महाराज दशरथांच्या रथाच्या चाकाचा खिळा बाहेर आला आणि रथ डगमगू लागला, अशा स्थितीत कैकेयीने खिळ्याच्या जागी आपले बोट ठेवले आणि महाराजांचे प्राण वाचवले.

रणांगणात कैकेयीच्या धाडसावर राजा दशरथ खूप खुश झाले आणि तीला तीन वरदान मागायला सांगितले, कैकेयीने त्या वेळी सांगितले की त्याची गरज नाही. कधी गरज पडली तर असश्य मागेल. कैकेयीने राजा दशरथाला या वरदानाच्या जाळ्यात अडकवून रामासाठी 14 वर्षांचा वनवास मागितला, पण कैकेयीने रामासाठी 14 वर्षांचा वनवास का मागितला? यामागे अनेक रहस्ये आहेत.

हे सुद्धा वाचा

फक्त 14 वर्षांचा वनवास का?

कैकेयीनेच भगवान रामासाठी 14 वर्षांचा वनवास गृहित धरला आणि समजावून सांगितले की एखादी व्यक्ती त्याच्या 14 म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये,  बुद्धी, मन आणि अहंकार यांच्यावर तारुण्यातच नियंत्रण मिळवू शकला तरच तो सक्षम होईल.  रावणाचा वध करण्यासाठी हे फार महत्त्वाचे होते.

कैकेयीचा रामावर विश्वास होता

ज्या वेळी अयोध्येत ही घटना घडत होती, त्या वेळी रावणाच्या आयुष्यात फक्त 14 वर्षे उरली होती. हे कैकेयीला माहीत होते. ही घटना अयोध्येत घडत होती, पण ती देवलोकात नियोजित होती. कैकेयीची रामावर श्रद्धा होती, मात्र दशरथ राजा पुत्र मोहाने बांधले गेले होते.

शनीच्या संक्रमणाची 14 वर्षे

रामायण आणि महाभारत या दोन्ही कथांमध्ये 14 वर्षांच्या वनवासाची बाब समोर येते. रामायणात भगवान रामांना 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला होता. महाभारतात असताना पांडवांना 13 वर्षांचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञानाचा सामना करावा लागला. यामागे ग्रहांचे संक्रमणही महत्त्वाचे असते. त्या काळच्या लोकांचे आयुष्य आजच्या युगापेक्षा खूप जास्त असायचे.  शनि चालिसामध्ये ‘राज मिलत बन रामही दिना’ असा उल्लेख आहे. कैकेयहूं की मती हरि लिन्हा..’ म्हणजे शनिच्या अवस्थेमुळे कैकेयीच्या मतीचा वध झाला आणि भगवान रामाला शनीच्या काळात वन-अरण्यात भटकंती करावी लागली. त्याचवेळी रावणावरही शनीचा प्रभाव पडला आणि त्याचा रामाने वध केला. शनीने आपल्या दशामध्ये एकाला कीर्ती दिली आणि दुसऱ्याला मुक्ती. अशी ही पौराणिक कथा आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)