मुंबई : इस्लामिक कॅलेंडरनुसार नववा महिना रमजानचा (Ramzan) असतो. रमजानला रमदानही म्हटलं जातं. मुस्लिम समुदायातील लोक हे या महिन्याला सर्वात पवित्र महिना मानला जातो. रमजानपूर्वी रोजाची तारीख चंद्रोदयानंतरच निश्चित केली जाते. यावेळी 13 एप्रिलला रमजानचा चंद्र दिसला आणि 14 एप्रिलला पहिला रोजा ठेवण्यात आला आहे. चंद्रोदयाच्या हिशोबाने रमजानचा महिना कधी 29 तर कधी 30 दिवसांचा असतो. चला जाणून घ्या रोजा ठेवण्याचं कारण (Ramazan 2021 Know The Importance And History Of Roza) –
इस्लाम धर्मानुसार, रोजा ठेवण्याची परंपरा अतिशय जुनी आहे. इस्लामिक मान्यतांनुसार, 610 ईसवी सनमध्ये इम्लामिक पैगंबरला पवित्र किताब कुरानाची माहिती मिळाली तेव्हापासून जगभरातील मुस्लमान कुरानच्या स्मरणात रोजा ठेवतात. त्यानंतर रमजानचा महिना पवित्र महिना मानला जातो.
या संपूर्ण महिन्यात इस्लाम धर्माचे लोक सूर्योदयासोबत रोजाला सुरुवात करतात आणि सूर्यास्तच्या नमाजासोबत रोजा सोडतात. यानंतर या महिन्याला यासाठीही पवित्र मानलं जातं की या महिन्यात पैंगबर साहेबला अल्लाहने आपलं दूत म्हणून निवडलं होतं. त्यामुळे या महिन्यात रोजे ठेवणे अनिवार्य मानलं जातं.
मुस्लमान समुदायाचे लोक सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही खाल्लं जात नाही, पाणीही पिलं जात नाही. सूर्य निघाल्यानंतर पहिले सहरी होते, म्हणजे सकाळच्या अजानपूर्वी सहरी खाऊ शकतात. सहरीनंतर सूर्यास्तापर्यंत काहीही खाणे-पिलं जात नाही. सायंकाळी नमाज पठनानंतर इफ्तारी असते. यादरम्यान लोक अल्लाहची इबादत करतात.
रोजा दरम्यान स्वत:वर नियंत्रण ठेवावं. या दरम्यान कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणारं असं काम करु नये. रोजादरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यासही मनाई असते. जर असं केलं तर सहरीपूर्वी पवित्र होणे गरजेचं असते.
रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा ठेवण्यातून काही लोकांना सूट असते. आजारी व्यक्ती आणि कुठल्या प्रवासावर गेलेल्या व्यक्तीला यातून सूट देण्यात आली आहे. त्याशिवाय गर्भवती महिला, पीरियड्स असेल तर आणि लहान मुलांनाही यातून सूट देण्यात आली आहे.
IslamicFinder.com नुसार –
एप्रिल 12 – पहाटे 04.34 , सायंकाळी 06:47
एप्रिल 13 – पहाटे 04.34, सायंकाळी 06:47
एप्रिल 14 – पहाटे 04:35, सायंकाळी 06:47
एप्रिल 15 – पहाटे 04:34, सायंकाळी 06:48
एप्रिल 16 – पहाटे 04:33, सायंकाळी 06:48
एप्रिल 17 – पहाटे 04:31, सायंकाळी 06:49
एप्रिल 18 – पहाटे 04:30, सायंकाळी 06:49
एप्रिल 19 – पहाटे 04:29, सायंकाळी 06:50
एप्रिल 20 – पहाटे 04:28, सायंकाळी 06:50
एप्रिल 21 – पहाटे 04:26, सायंकाळी 06:51
एप्रिल 22 – पहाटे 04:25, सायंकाळी 06:52
एप्रिल 23 – पहाटे 04:24, सायंकाळी 06:52
एप्रिल 24 – पहाटे 04:23, सायंकाळी 06:53
एप्रिल 25 – पहाटे 04:22, सायंकाळी 06:53
एप्रिल 26 – पहाटे 04:21, सायंकाळी 06:54
एप्रिल 27 – पहाटे 04:19, सायंकाळी 06:55
एप्रिल 28 – पहाटे 04:18, सायंकाळी 06:55
एप्रिल 29 – पहाटे 04:17, सायंकाळी 06:56
एप्रिल 30 – पहाटे 04:16, सायंकाळी 06:56
मे 01 – पहाटे 04:15, सायंकाळी 06:57
मे 02 – पहाटे 04:14, सायंकाळी 06:58
मे 03 – पहाटे 04:13, सायंकाळी 06:58
मे 04 – पहाटे 04:12, सायंकाळी 06:59
मे 05 – पहाटे 04:11, सायंकाळी 06:59
मे 06 – पहाटे 04:10, सायंकाळी 07:00
मे 07 – पहाटे 04:09, सायंकाळी 07:01
मे 08 – पहाटे 04:08, सायंकाळी 07:01
मे 09 – पहाटे 04:07, सायंकाळी 07:02
मे 10 – पहाटे 04:06, सायंकाळी 07:02
मे 11 – पहाटे 04:05, सायंकाळी 07:03
मे 12 – पहाटे 04:04, सायंकाळी 07:04
मे 13 – पहाटे 04:03, सायंकाळी 07:04
Ramzan Time Table In India 2021 | कधीपासून सुरु होतोय रमजान, जाणून घ्या सेहरी आणि इफ्तारीचं वेळापत्रकhttps://t.co/QgiZ49nPJd#ramzan
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
Ramazan 2021 Know The Importance And History Of Roza
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Ramadan 2021 | रमजानची तारीख, सेहरी आणि इफ्तारीची वेळ, जाणून घ्या रमजानचं महत्त्व…
Shab-e-Barat 2021 | या वर्षी शब-ए-बारात कधी आहे? नेमकं काय होतं या दिवशी?, जाणून घ्या संपूर्ण माहिती