Ravivar Upay : सूर्यासारखे चमकेल भाग्य, रविवारी करा हे सोपे उपाय

| Updated on: May 21, 2023 | 11:07 AM

रविवारी सूर्यदेवाची उपासना केल्याने माणसाला निरोगी शरीर प्राप्त होते. एवढेच नाही तर ज्योतिषशास्त्रात रविवारी उपवासाचे फायदेही सांगितले आहे.

Ravivar Upay : सूर्यासारखे चमकेल भाग्य, रविवारी करा हे सोपे उपाय
सूर्यदेव उपासना
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology), प्रत्येक दिवस विशीष्ट देवतेला समर्पित आहे. रविवारी सूर्यदेवाची उपासना केल्याने माणसाला निरोगी शरीर प्राप्त होते. एवढेच नाही तर ज्योतिषशास्त्रात रविवारी उपवासाचे फायदेही सांगितले आहे. या दिवशी कार्य सिद्धी आणि आरोग्य यासाठी रविवारचा उपवासही पाळला जातो. असे मानले जाते की या दिवशी काही विशेष ज्योतिषीय उपाय केल्यास व्यक्तीला सर्व त्रासांपासून लवकरच मुक्ती मिळते. यासोबतच सूर्यदेव प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण करतात. या दिवशी करावयाचे उपाय जाणून घेऊया.

 रविवारी करा हे प्रभावी उपाय

  • ज्योतिष शास्त्रानुसार, रविवारी घरातील कोणत्याही महिलेकडून आशीर्वाद म्हणून मूठभर तांदूळ घ्या. हे  तांदूळ एका कापडात बांधून सोबत ठेवा. हा उपाय केल्याने तुमची चिंता किंवा तणाव लवकर दूर होईल.
  • जोडीदाराचा आनंद परत मिळवण्यासाठी रविवारी भगवान शिवाची विधिवत पूजा करा. यासोबतच यावेळी यशासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा. भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा.
  • जर तुमचा जोडीदार किंवा पालक यांच्यात ताळमेळ नसेल तर त्यांचे नाते सुधारण्यासाठी दोघांच्या कपड्यांमधून प्रत्येकी एक धागा काढा. यानंतर हे धागे एकत्र बांधून मंदिरात ठेवा. यासोबत तुपाचा दिवा लावावा. तसेच, संबंध सुधारण्यासाठी हात जोडून प्रार्थना करा.
  •  उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य मिळविण्यासाठी रविवारी सूर्यदेवाच्या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंत्र आहे- ओम घ्रिण: सूर्याय नमः.
  •  सकारात्मकतेने परिपूर्ण होण्यासाठी रविवारी स्नान वगैरे केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.
  •  जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडण्यासाठी खैराच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर आहे. एवढेच नाही तर हात जोडून नमस्कार केला पाहिजे. अशा परिस्थितीत जर तुमच्या घराजवळ खैराचे झाड आढळले नाही तर तुम्ही त्या झाडाचा फोटो नेटवरून डाउनलोड करू शकता. ते पाहिल्यानंतर दिवसभर सोबत ठेवा.
  •  प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी घरात हरणाचा फोटो लावा. या दरम्यान हरणाचा चेहरा तुमच्या समोर असावा हे लक्षात ठेवा. यासोबतच फोटोत शिंगे नसलेले हरण असावे हेही लक्षात ठेवा. घरामध्ये हरणाचा फोटो अशा ठिकाणी ठेवा की, घरातून बाहेर पडताना हरणाचे दर्शन होईल.
  •  जर तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची असेल किंवा नोकरी बदलण्याची चिंता वाटत असेल तर रविवारी मंदिरात गोड काहीतरी दान केल्याने फायदा होतो. यासोबतच सूर्यदेवाला हात जोडून नमस्कार करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)