त्र्यंबकेश्वर, नाशिक : बारा ज्योतिर्लिंग पैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) देवस्थानाची जगभर ओळख आहे. पवित्रस्थळ म्हणून दर्शनामुळे अनेक भाविकांची मोठी गर्दी होत असते. याशिवाय कालसर्प, नारायणनागबळी अशा पूजाविधी येथे केल्या जातात त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरीचे धार्मिक महात्म आहे. कुंभमेळाही (Kumbhmela) याच तीर्थस्थळी होत असल्याने भक्तिमय वातावरण या नगरीत नेहमीच असते. याशिवाय संतश्रेष्ट निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील असल्याने वारकऱ्यांची मोठी लगबग येथे असते. मात्र, याच परिसरात मद्य आणि मांस (shop) विक्रीची दुकाने असल्याने अटल आखाड्यातील महंत प्रज्ञानपुरी यांनी ही दुकाने हटवा अशी मागणी केली आहे.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातून मद्य आणि मांस विक्रीची दुकाने हटवा अशी मागणी केली गेल्याने भविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मद्य आणि मांस विक्रीची दुकाने त्र्यंबकेश्वरपासून किमान ५ किलोमीटर बाहेर असायला हवीत असेही मत महंत प्रज्ञानपुरी यांनी व्यक्त केले आहे.
अन्यथा भाविकांनी मंदिरातील सशुल्क दर्शन टाळून मंदिरांवर आर्थिक बहिष्कार टाकावा अशी भूमिकाच महंत प्रज्ञानपुरी यांनी घेतली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे नेहमीच राज्यातूनच नव्हे देशातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. जेथे पार्किंग व्यवस्था आहे तेथूनच मद्य आणि मांस विक्रीची दुकाने आहे.
मंदिर परिसर बघता सर्वच धार्मिक स्थळ हे जवळजवळ आहे. त्यात काही मीटर अंतरावरच मांस आणि मद्य विक्रीची दुकाने असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत असतात.
अनेक साधू, महंत येथे दर्शनासाठी येत असतांना त्यांच्या निदर्शनास मद्य आणि मांस विक्रीची दुकाने येतात यावरून अनेकदा दुकाने हटवा मागणी केली गेलीय.
आता महंत प्रज्ञानपुरी यांनी केलेल्या मागणीला यश येते का याकडे सर्वच भाविकांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे शासनाच्या भूमिकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.