नव्या वर्षात नव्या संकल्पांसह सकारात्मक सुरुवात करण्याची जवळपास सर्वांची तयारी आहे. वर्षातील शेवटचा महिना सुरू असून अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी प्रयत्न असणार आहे. पण या प्रयत्नांना कसलाच अडसर येऊ नये असं वाटत असेल तर घरातून काही गोष्टी तात्काळ काढून टाका. कारण वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण या वस्तूंमधून घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. जर तुम्हाला वाटत असेल की नव्या वर्षाची सुरुवात सकारात्मक उर्जेने व्हावी तर घरातून काही वस्तू बाहेर काढणं खूपच आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगते..
- वास्तुशास्त्रानुसार, घरात तुटलेला पलंग नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. वैवाहिक जीवनात कलह निर्माण होतात. त्यामुळे वैवाहिक जीवनात अडसर येऊ नये असं वाटत असेल तर पहिल्यांदा तुटलेला पलंग बाहेर काढा.
- घरात तुटकीफुटकी भांडी असतील तर त्यातूनही नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. वास्तुशास्त्रानुसार अशी भांडी घरात ठेवणं अशुभ मानलं जातं.
- नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी तुटलेल्या चपला आधी फेकून द्या. यामुळे नकारात्मक उर्जेचा वास राहतो आणि हाती घेतलेली कामं होत नाहीत. आर्थिक अडचण येते.
- वास्तुशास्त्रानुसार, काचेच्या वस्तूंना तडा गेला असल्यास त्या तात्काळ फेकून द्या. फोटो फ्रेम वगैरे असेल तर काढून टाका किंवा दुरूस्त करून आणा. तडा गेलेल्या काचेमुळे नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते.
- वास्तुशास्त्रानुसार,घरात खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या भंगारात काढून टाका. कारण यामुळे अडगळ तर होते वरून नकारात्मक ऊर्जेचं स्त्रोत ठरते.
- जीवनात आपली दशा आणि दिशा ठरवण्यात घड्याळाचं महत्त्व आहे. नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी खराब घड्याळ बाहेर टाकून द्या.
- घरात तुटक्याफुटक्या मूर्ती असतील तर त्यासुद्धा बाहेर काढा. कारण वास्तुशास्त्रानुसार खंडीत मूर्ती घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. खंडीत देवीदेवतांच्या मूर्तींची पूजा करणं योग्य नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)