रूद्राक्ष
Image Credit source: Social Media
मुंबई : शिवपुराणात रुद्राक्ष (Rudraksha) धारण करण्याची पद्धत आणि त्याचे नियम सविस्तर सांगितले आहेत. असे म्हणतात की, रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूतून झाली आहे. आणि भगवान शिवाच्या अत्यंत आवडत्या वस्तूंपैकी एक आहे. असे मानले जाते की जो रुद्राक्ष धारण करतो त्याच्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. एवढेच नाही तर अनेक आजारांपासूनस सुटका मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष धारण करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे याशीवाय तो धारण केल्यानंतर काही गोष्टींची विशेष काळजीही घेणे आवश्यक आहे. या गोष्टींची काळजी न घेतल्यास महादेवाच्या क्रोधाला सामोरे जावे लागू शकते. आज आपण अशा पाच ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे रुद्राक्ष धारण करून जाऊ नये.
या ठिकाणी चुकूनही रुद्राक्ष धारण करून जाऊ नका
- शास्त्रात सांगितले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने रुद्राक्ष धारण केला असेल तर त्याने अशा ठिकाणी जाऊ नये, जिथे एखाद्याचा मृत्यू झाला असेल. या ठिकाणी रुद्राक्ष धारण करून जाणे चांगले मानले जात नाही. जर तुमच्यासाठी जाणे खूप महत्वाचे असेल तर रुद्राक्ष काढून जावे.
- ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीने रुद्राक्ष धारण केला असेल तर त्याने मांस आणि मद्यापासून दूर राहावे. एवढेच नाही तर रुद्राक्ष धारण करून अशा ठिकाणी जाण्यास मनाई आहे. यासोबतच अपवित्र ठिकाणी जाऊ नये.
- शास्त्रानुसार ज्या ठिकाणी मुलाचा जन्म होतो त्या ठिकाणी रुद्राक्ष अजिबात धारण करू नये. मुलाच्या जन्मानंतर ते स्थान एक महिन्यासाठी अपवित्र मानले जाते. असे केले तर रुद्राक्ष यामुळे निस्तेज होतो.
- असे मानले जाते की झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढावा. असे म्हणतात की झोपताना आपले शरीर अशुद्ध आणि सुस्त राहते. यासोबतच रात्री झोपताना रुद्राक्ष तुटण्याची भीती असते.
- यासोबतच अशा ठिकाणी अजिबात रुद्राक्ष धारण करू नये, जिथे चुकीच्या गोष्टी घडतात.
शरीर आणि मनासाठी फायदेशीर
-
- रुद्राक्षामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, जी रोगांशी लढते, त्यामुळे आरोग्य सुधारते. आयुर्वेदानुसार रुद्राक्ष शरीराला बळ देतो. याने रक्तातील अशुद्धता दूर होते. हे मानवी शरीराच्या आतून तसेच बाहेरील बॅक्टेरिया काढून टाकते. रुद्राक्ष डोकेदुखी, खोकला, पक्षाघात, रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित समस्या दूर करतो.
- रुद्राक्ष धारण केल्याने चेहऱ्यावर चमक येते, ज्यामुळे व्यक्तिमत्व शांत आणि आकर्षक बनते. जपासाठी रुद्राक्षाचे मणी वापरतात. नामजपाच्या प्रक्रियेमुळे जीवनात पुढे जाण्यासाठी आध्यात्मिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे रुद्राक्षाच्या बिया आरोग्य आणि आध्यात्मिक लाभ देण्यासाठी उपयुक्त आहेत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)