ताटात का वाढू नये तीन पोळ्या, अनेकांना नाही माहिती यामागचे करण

| Updated on: Jun 09, 2023 | 11:28 AM

जेवणात 3 पोळ्या एकत्र (Rules of serving) देणे देखील अशुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जेवणात तीन पोळ्या कधीही एकत्र वाढू नयेत.

ताटात का वाढू नये तीन पोळ्या, अनेकांना नाही माहिती यामागचे करण
चपाती
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात अनेक श्रद्धा आणि मान्यता प्रचलित आहेत. उपासना, उपवास इत्यादी आणि दैनंदिन कामांशी संबंधित अनेक प्रकारच्या समजुती देखील आहेत. रोज अशा अनेक गोष्टी असतात ज्या शुभ-अशुभ कर्मांसोबत जोडल्या जातात. सध्या खाण्या-पिण्यापासून ते झोपेपर्यंत अनेक शुभ-अशुभ गोष्टी प्रकरशाने पाळल्या जातात. यापैकीच एक मान्यता म्हणजे, जेवणात 3 पोळ्या एकत्र (Rules of serving) देणे देखील अशुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जेवणात तीन पोळ्या कधीही एकत्र वाढू नयेत. जेवणात तीन पोळ्या एकत्र का देऊ नयेत याबद्दल जाणून घेऊया.

श्राद्ध पक्षात वाढतात तीन पोळ्या

असेही मानले जाते की मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन पोळ्या कधीच वाढत नाही.
असे मानले जाते की, जेवणात तीन पोळ्या एकत्र खाऊ नयेत कारण शरीराचे वजन समान आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन पोळ्या खाणे पुरेसे आहे. एक वाटी वरण, 50 ग्रॅम तांदूळ, दोन पोळ्या आणि एक वाटी भाजी हा आहार सर्वोत्तम मानला जातो. भारतीय खाद्य संस्कृतीत पोळ्यांना विशेष महत्व आहे. याशिवाय काही धार्मिक समजुती आहेत ज्या वेगवेगळ्या कारणांसाठी वर्षानुवर्षे पाळल्या जात आहेत.

 शत्रुत्वाची भावना वाढते

मान्यतेनुसार, एखाद्या व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या एकत्र दिल्यास आणि त्या खाणाऱ्या व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते. यासाठी कोणत्याही ताटात तीन पोळ्या एकत्र वाढू नयेत.

हे सुद्धा वाचा

3 ही अशुभ संख्या  मानली जाते

हिंदू धर्मात प्राचीन काळापासून पूजा किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी 3 क्रमांकाचा वापर अशुभ मानला जातो. पूजेत कोणतीही गोष्ट जोड्यांमध्येच अर्पण केली जाते. हे 3 च्या संख्येत दिले जात नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी जास्त अन्न देणे म्हणजे अन्नाचा अपव्यय होऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)