आदेश बांदेकर यांना हटवलं, सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती

| Updated on: Nov 07, 2023 | 3:33 PM

सिद्धीविनायक मंदिराच्या अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदा सरवणकर हे शिंदे गटाचे नेते आहेत. याआधी आदेश बांदेकर हे सिद्धीविनायक मंदिराच्या अध्यक्षपदी होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदेश बांदेकर यांना हटवलं, सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्षपदी या नेत्याची नियुक्ती
सिद्धिविनायक मंदिर मुंबई
Image Credit source: Social Media
Follow us on

दिनेश दुखंडे, निवृत्ती बाबर

मुंबई : सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्षपदी नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाते नेते सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर आता अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या आधी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर हे सिद्धिविनायक न्यास मंदिराचे अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ 23 जुलै 2023 ला संपला. तीन वर्ष त्यांना ही जबाबदारी सांभाळली. ही जबाबदारी आता सदा सरवणकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते अध्यक्ष असतील. अध्यक्षपद मिळाल्यानंतर सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

विकास कामांसाठी पंचवीस कोटींचा निधी

शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. न्यासाकडे सर्वांचंच लक्ष असतं त्या दृष्टीने मी आव्हाण पार पाडील असं सरवणकर म्हणाले. गणेश भक्तांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, याशिवाय सुरक्षा आणि वाहतूक याकडे आमचं विशेष लक्ष असेल आणि यातील तृटी दूर करण्यासाठी मी लवकरच निर्णय घेईल असही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मागच्या काळात जे अध्यक्ष झाले त्यांनी त्यांच्या परीनं  काम केलं त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, असं सदा सरवणकर म्हणाले. राज्य सरकारनं 25 कोटी रूपये दिले आहे. त्यानुसार काम केले जाईल असंही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी मनसेच्या आरोपावरही भाष्य केले आहे. मनसेकडून जे आरोप झाले त्यावर मी अगोदरच बोललो होतो लवकर कारवाई करावी अशी अजून देखील मागणी आहे असं सरवणकर म्हणाले.