मुंबई : सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M34 5G लॉन्च केला आहे. विषेश म्हणजे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हा फोन आला आहे. यामध्ये एक मजबूत प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 5G सपोर्ट आहे. हा फोन AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह आहे. सॅमसंगचा इन-हाउस Exynos चिपसेट यामध्ये उपलब्ध असेल. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण दिले आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. डिव्हाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही यात देण्यात आले आहे.
सॅमसंगने हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M34 5G चा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटच्या फोनची किंमत 17,999 आहे. तसेच 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटच्या फोनची किंमत 18,999 रूपये आहे. हा फोन प्रिझम सिल्व्हर, मिडनाईट ब्लू आणि वॉटरफॉल ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
याचे प्रीबुकिंग ७ जुलैपासून म्हणजेच आजपासून सुरू झाले आहे. हा फोन अॅमेझाॅनवरून खरेदी करू शकता. प्रीबुकिंग करणाऱ्यांना मोफत चार्जर मिळणार आहे. कंपनी या फोनवर 1000 रुपयांची सवलत देखील दिली आहे, परंतु ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच आहे.
या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास, Samsung Galaxy M34 5G मध्ये 6.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह आहे. हा स्मार्टफोन Octacore Exynos 1280 प्रोसेसरवर काम करतो. यात 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.
स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे. याशिवाय, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळतात. फ्रंटमध्ये कंपनीने 13MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइस 6000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगसह येते.
कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ सपोर्ट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 13 वर आधारित One UI 5.1 वर काम करतो.