श्री गणेश
Image Credit source: Social Media
मुंबई, संकष्टी चतुर्थी (Sankashi Chaturthi) व्रत हे गणेशाला समर्पित आहे. दीर्घायुष्य आणि जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी उपवास करतात. उद्या 11 डिसेंबर 2022 रोजी संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे व्रत फार महत्वाचे मानले जाते. असे म्हटले जाते की, जो व्यक्ती हे व्रत पाळतो त्याला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामनाही श्रीगणेश पूर्ण करतात, कारण भगवान गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे दाता आहे.
संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त
चतुर्थी तिथी 11 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4.14 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6.48 वाजता समाप्त होईल. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर संकष्टी गणेश चतुर्थी व्रत सोडता येईल. यावेळी 11 डिसेंबर रोजी चंद्रोदयाची वेळ सायंकाळी 7.45 सांगितली आहे.
पूजेची पद्धत
- चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.
- यानंतर पूजास्थानाची स्वच्छता केल्यानंतर गंगेचे पाणी शिंपडावे, त्यामुळे ती जागा पवित्र होईल.
- विधीपूर्वक गणेशाची पूजा करा, त्यांना फळे आणि लाडू अर्पण करा.
- पूजेनंतर गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा.
- त्यानंतर संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करावे.
संकष्टी गणेश चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी करा हे उपाय
- संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला दोन्ही हातांनी लाल फुले अर्पण करा. पुष्प अर्पण करताना ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने घरात सुख-शांती राहते.
- संकष्टी गणेश चतुर्थीच्या दिवशी आठ मुखी रुद्राक्षाची विधिवत पूजा करून गळ्यात हार घाला. असे केल्याने नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता वाढते.
- संकष्टी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला रोळी आणि चंदनाचा तिलक लावावा. तसेच गणेशाच्या मंत्राचा 11 वेळा जप करावा.
- मंत्र आहे – ‘वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटी सम्प्रभ: निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा…’ हा उपाय केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)