Sankashti Chaturthi 2023: आज अंगारीका संकष्टी चतुर्थी, ‘या’ सोप्या उपायांनी होईल मार्गातील संकट दुर

| Updated on: Jan 10, 2023 | 12:37 PM

असे म्हंटले जाते की, हे व्रत पाळल्यास भक्तांवर येणारे प्रत्येक संकट टळते. या व्रताच्या प्रभावाने भक्तांना दीर्घायुष्याचे वरदान मिळते.

Sankashti Chaturthi 2023: आज अंगारीका संकष्टी चतुर्थी, या सोप्या उपायांनी होईल मार्गातील संकट दुर
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, एका वर्षात 4 मोठ्या चतुर्थी येतात, ज्यांना अंगारीका संकष्टी चतुर्थी (Angarika Shankashti Chaturthi) असेही म्हणतात. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला तिलकुट चतुर्थी असे म्हणतात आणि तिचे विशेष महत्व मानल्या जाते. यावेळी तिलकुट चतुर्थी 10 जानेवारी 2023 म्हणजेच आज आहे. चतुर्थी (Chaturthi) तिथीला उपवास ठेवण्यात येतो आणि गणपतीची पूजा केल्यानंतर रात्री चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडतात. चला तर मग जाणून घेऊया  दिवशी पूजेसाठी कोणते साहित्य आवश्यक आहे आणि या दिवशी कोणते उपाय करावेत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. 2023 ची ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. आज रात्री 8.50 वाजता चंद्राेदय होणार आहे.

गणरायाच्या कृपेने संकट होतात दुर

माघ महिन्यात येणारी तिलकुट चतुर्थी खूप महत्वाची मानली जाते. असे म्हंटले जाते की, हे व्रत पाळल्यास भक्तांवर येणारे प्रत्येक संकट टळते. या व्रताच्या प्रभावाने भक्तांना दीर्घायुष्याचे वरदान मिळते.

पुजेचे साहित्य

संकष्टी चतुर्थीला पूजेसाठी लाकडी चौकटी, पिवळे वस्त्र, जनेयू, सुपारी, सुपारी, लवंग, वेलची, गंगेचे पाणी, गणपतीची मूर्ती, लाल फुले, 21 दुर्वाची जोड.

हे सुद्धा वाचा

अक्षत, हळद, अत्तर, अबीर, गुलाल, गाईचे दूध, दिवा, धूप, 11 किंवा 21 तिळाचे लाडू, मोदक, हंगामी फळे, संकष्टी चतुर्थी उपवास कथा पुस्तक, चंद्राला अर्घ्य देण्यासाठी दूध, गंगेचे पाणी, कलश दानासाठी गाईला हिरवा चारा, अन्न, कपडे

या दिवशी करा हे उपाय

 

  1.  गणेशाची पूजा करण्यासाठी लाल वस्त्र घ्या. आता त्यात श्रीयंत्र आणि सुपारी ठेवा, पूजेनंतर हे श्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या घरात संपत्ती वाढेल.
  2. प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी श्रीगणेशाच्या समोर उदबत्ती लावून मंत्रांचा जप करा.
  3. संकष्टी चतुर्थीला तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणेश चालीसा पठण करा आणि मोदकाचा नैवेद्य दाखवा.
  4. नोकरी-व्यवसायात  लाभ मिळण्यासाठी संकष्टीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि श्री गणेशासमोर दोन सुपारी आणि दोन विड्याची पान ठेवा. असे केल्याने प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)