मुंबई, 2022 मधील शेवटची एकादशी 19 डिसेंबर रोजी येत आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफाला एकादशी (Saphala Ekadashi 2022) म्हणतात. भगवान विष्णूला समर्पित या व्रताची पूजा केल्याने इच्छित फलप्राप्ती हाेते. सोबतच दीर्घकाळ रखडलेले कामही पुर्ण हाेते. सफाला एकादशी ही भगवान विष्णूची सर्वात आवडती एकादशी मानली जाते. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. सफाला एकादशीची तिथी, शुभ वेळ आणि उपासना पद्धत जाणून घेऊया.