मुंबई : शनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित असतो (Saturday Astro Tips). या दिवशी पूजा केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात. भगवान शनिवेद यांना न्यायाचे देव म्हटले जाते. मान्यता आहे की भगवान शनिदेव सर्वांच्या त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात. जर एखाद्या व्यक्तीवर शनिचा वाईट परिणाम होत असेल तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे शनिवारी बरेच लोक शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करतात (Saturday Astro Tips Donate These Things On Saturday To Pleased Lord Shanidev).
या दिवशी असे कोणतेही काम केले जाऊ नये ज्यामुळे भगवान शनिदेव नाराज होतील. शनिवारी काही वस्तू आहेत ज्या दान केल्याने आपले सर्व त्रास दूर होतात. शनिवारी कोणत्या वस्तू दान कराव्यात हे सांगूया –
शनिवारी काळी तिळ दान करणे अत्यंत शुभ आहे. या दिवशी काळी तिळ दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि राहू-केतूचा दोषही शांत होतो.
गहू, तांदूळ, मका, काळी उडीद आणि इतर वस्तुंचा समावेश असणारे सात प्रकारचे धान्य शनिवारी दान करावे. या दिवशी गरजू लोकांना धान्य दान केल्याने शनि दोषाचा प्रभाव कमी होतो आणि शनिदेव प्रसन्न होतात.
शनिवारी लोखंडी वस्तू दान करणे किंवा खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंचे दान केल्याने कुंडलीतील शनि दोषांच्या समस्येपासून मुक्त होते.
शनिवारी बूट आणि चप्पल दान करणे खूप शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की, काळ्या रंगाचे बूट दान करणे खूप शुभ मानले जाते, यामुळे तुम्हाला सर्वत्र यश मिळेल.
शनिचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी निळ्या रंगाची फुले अर्थात अपराजिता आणि काळ्या फुलांचे दान करणे शुभ आहे. असे मानले जाते की, या दिवशी निळ्या फुलांचे दान करणे खूप शुभ आहे. शनिवारी निळ्या रंगाचे फूल अर्पण केल्याने सर्व त्रास दूर होतात.
Vastu Tips | वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचा फोटो लावा, सर्व समस्या होतील दूरhttps://t.co/udfYEvjNWy#VastuTips #LordHanuman
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2021
Saturday Astro Tips Donate These Things On Saturday To Pleased Lord Shanidev
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Shanidev | ‘या’ लोकांवर शनिदेव राहतात प्रसन्न, पूर्ण होतात सर्व मनोकामना…
Shanidev | शनिदेवाला तेल का अर्पण करतात? जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा…