मुंबई, हिंदू मान्यतेनुसार, स्वप्नशास्त्र हे तुमचे भविष्य पाहण्यासाठी खिडकीसारखे आहे. एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नांमध्ये दिसणार्या वस्तू, वर्ण आणि भावनांचे विश्लेषण आणि अर्थ लावण्यासाठी स्वप्नांचा प्रतीकात्मक अर्थ असतो. यातील काही स्वप्ने अशुभ माहिती दर्शवतात तर काही संमिश्र संकेत देतात. अशी अनेक स्वप्ने आहेत जी तुमच्या भाग्याचेही सूचक असतात. तुम्ही कधी असे स्वप्न (Dream) पडले आहे का? जे सकाळी उठल्यावरही तुमच्या लक्षात राहिले आणि दिवसभर तेच स्वप्न पुन्हा पुन्हा आठवत राहिले. बऱ्याच जणांसोबत असे घडते. आपण जी काही स्वप्ने पाहतो, ती आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे सूचक असतात, अशाच काही स्वप्नांबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
जर तुम्ही तुमच्या स्वप्नात कोणतेही धार्मिक पुस्तक पाहिले असेल तर ते खूप शुभ संकेत आहे. हे पुस्तक कोणत्याही धर्माशी संबंधित असू शकते. समजा तुम्ही सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहात आणि कोणत्याही मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा तो प्रयत्न असू शकतो.
जर तुम्ही स्वप्नात सायकल चालवत कुठेतरी जात असाल तर ते देखील शुभ प्रतीक आहे. म्हणजे तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही आयुष्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहात. तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात, परंतु तुम्हाला वेळोवेळी अडचणींचा सामना करावा लागू शकतो, यासाठीही तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असले पाहिजे.
जर तुम्ही तुमच्या स्वप्नात कोणत्याही प्रकारचे बिस्किट पाहिले असेल तर ते तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी स्वप्न आहे. समजा तुम्हाला लवकरच काही प्रकारचे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. बिस्किट हे जीवनातील गोड अनुभवाचे प्रतीक आहे.
स्वप्नात फूल दिसणे हे शुभाचे प्रतीक आहे, फूल हे सुख, समाधान आणि तारुण्याचे प्रतीक आहे. पण हा आनंद तात्पुरता असेल.
जर तुम्ही स्वपनात तुमची नखे कापली असतील किंवा तुम्ही नखे कापत असाल तर असे केल्याने तुमचे कर्ज लवकर कमी होईल किंवा पूर्ण होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)