तुम्हाला जे स्वप्न पडतात त्यातून देखील तुम्हाला विविध प्रकारचे संकेत मिळत असतात. स्वप्न शास्त्रानुसार अनेकदा तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडणार आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या घटनांचे संकेत तुम्हाला स्वप्नातून मिळतात. जर तुम्ही स्वत: जोरजोरात रडत आहात असं स्वप्न तुम्हाला पडलं तर ते स्वप्न अत्यंत शुभ मानलं जातं. तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे, असे संकेत हे स्वप्न देते. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठा बदल घडणार आहे, असा संकेत देखील या स्वप्नातून मिळतो.
स्वप्नात रडण्याचा अर्थ काय?
तुम्ही स्वत: रडत आहात असं स्वप्न जर तुम्हाला पडलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुमची कोणती तरी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात काहीतरी सकारात्मक बदल होतील. जर तुम्ही अविवाहित असाल आणि स्वप्नात तुम्ही स्वत:ला रडताना पाहिलं तर याचा अर्थ लवकरच तुमचा विवाह होणार आहे.
मात्र तुम्ही जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या मृत्यू झालेल्या व्यक्तीसोबत रडत असाल तर या स्वप्नाला अशुभ मानलं जातं. तुमच्या आयुष्यात काही तरी मोठं संकट येणार आहे, असा संकेत तुम्हाला या स्वप्नातून मिळतो. तसेच तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत, असा संकेत देखील या स्वप्नामधून मिळतो.
जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला रडताना पाहिलं तर हे देखील अशुभ स्वप्न मानलं जातं. तुमच्या आयुष्यात काही तरी संकट येणार आहे, असा याचा अर्थ होतो.तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळा येणार आहे, असा संकेत या स्वप्नातून मिळतो. तसेच तुम्हाला जर असं स्वप्न पडलं तर तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे संबंध बिघडू शकतात असा देखील त्याचा अर्थ होतो.
जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये ओरडत असाल तर यातून देखील एक मोठा संकेत तुम्हाला मिळतो. तुम्ही असंतुष्ट आहात, एखादी गोष्टी तुम्ही तुमच्या मनात ठेवली आहे, असा त्याचा अर्थ होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)