मुंबई, अयोध्येत रामलल्लाची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळमधून खास शालिग्राम दगड (Shaligram Stone Benefits) आणण्यात आले आहेत. सनातन धर्मात शालिग्राम दगडाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि राम हा विष्णूचा सातवा अवतार मानला जातो. काही लोकं आपल्या घरातील मंदिरात किंवा पूजेच्या ठिकाणी शालिग्राम ठेवतात. हे घरात ठेवल्याने केवळ भगवान विष्णूच प्रसन्न होत नाहीत तर धनाची देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते पण तुम्हाला माहित आहे का? की घरात शालिग्रामची स्थापना केल्यानंतर काही नियमांकडे दुर्लक्ष केल्याने देखील व्यक्तीचा नाश होतो.
शालिग्राम महाराजांना अक्षत म्हणजेच तांदूळ कधीही अर्पण करू नये असे ज्योतिषी सांगतात. दर महिन्याला येणारी एकादशी ही केवळ भगवान विष्णूलाच अर्पण केली जाते आणि त्यातही श्रीहरीला अक्षत अर्पण केले जात नाही.
जर तुम्हाला तुमच्या घरात शालिग्राम बसवायचा असेल तर तो तुमच्या कष्टाच्या पैशातून खरेदी करा आणि घरी आणा. शालीग्राम कधीही कोणाला भेट देऊ नये किंवा कोणाकडून भेट म्हणून स्विकारू नये. तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या कमाईतून विकत घेऊ शकता किंवा ऋषी किंवा संतांकडून घेऊ शकता.
शाळीग्रामच्या वापराने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. शालिग्रामचे सुमारे 33 प्रकार आहेत, त्यापैकी 24 हे श्री हरी भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. ज्या घरात शाळीग्राम ठेवला जातो, त्या घरात लोकांवर कोणतेही संकट येत नाही. घरात एकच शाळीग्राम ठेवावा असे ज्योतिषी सांगतात. चुकूनही एकापेक्षा जास्त शाळीग्राम ठेवू नका.
जर तुम्ही घरातील मंदिरात शालिग्राम ठेवले असेल तर तुम्ही मांस किंवा मद्य सेवन टाळावे. जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर किमान गुरुवारी अशा गोष्टींपासून दूर राहा. हा दिवस फक्त भगवान विष्णूला समर्पित आहे. जर तुम्हाला हा नियम पाळता येत नसेल तर शालिग्रामचे पवित्र नदीत विसर्जण करावे.
ज्योतिषी सांगतात की, शालिग्रामच्या पूजेचा नियम घरात सुरू झाला की तो अजिबात मोडू नये. म्हणजेच शाळीग्रामची नित्य पूजा करणे आवश्यक आहे. शाळीग्रामला चंदन, फुले, मिठाई इत्यादी नियमित अर्पण करत राहा. जर तुम्ही पूजेच्या वेळी तुळशीची डाहाळ वाहू शकत असाल तर ते खूप चांगले.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)