Shaligram Stone: शाळीग्राममुळे लाभते अफाट धनसंपत्ती, घरात ठेवण्याचे हे आहेत चार फायदे

| Updated on: Feb 02, 2023 | 9:43 PM

घरामध्ये शाळीग्राम ठेवणे किती शुभ असते हे तुम्हाला माहिती आहे का? शाळीग्राम घरी स्थापित केल्याने कोणते शुभ परिणाम मिळतात? आज  याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Shaligram Stone: शाळीग्राममुळे लाभते अफाट धनसंपत्ती, घरात ठेवण्याचे हे आहेत चार फायदे
शाळीग्राम
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, अयोध्येत रामलल्लाच्या उभारणीसाठी नेपाळमधून शालिग्रामचे खास खडक (Shaligram Stone) आणण्यात आले आहेत. शाळीग्राममध्ये भगवान विष्णू विराजमान असल्याचे सांगितले जाते. शालिग्राम किंवा शाळीग्रामचे  33 प्रकार आहेत, त्यापैकी 24 भगवान विष्णूच्या रूपाशी संबंधित आहेत. तुम्ही अनेकांना घरी शाळीग्राम ठेवताना पाहिलं असेल. घरामध्ये शाळीग्राम ठेवणे किती शुभ असते हे तुम्हाला माहिती आहे का? शाळीग्राम घरी स्थापित केल्याने कोणते शुभ परिणाम मिळतात? आज  याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

घरात शाळीग्राम ठेवण्याचे हे आहेत चार फायदे

अपार संपत्तीची प्राप्ती-

शालिग्राम हे भगवान विष्णूचे रूप मानले जात असल्याने त्याची घरामध्ये स्थापना केल्याने लक्ष्मी  प्रसन्न होते. एखाद्या व्यक्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला की, त्याच्यापासून दारिद्र्य किंवा गरिबी दूर राहते. अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते. त्यांचे जीवन सुख-समृद्धीने भरून जाते.

वास्तू दोष-

ज्या घरात शालिग्रामची पूजा केली जाते, त्या घरात वास्तू दोष आणि अडथळे आपोआप संपतात. एखाद्या घरामध्ये वास्तुशी संबंधित समस्या असल्यास आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असल्यास तेथे शालिग्रामची यथासांग पूजा करून प्रतिष्ठापना करावी. शालिग्राममध्ये वास्तू दोष संपवण्याची शक्ती आहे.

वैवाहिक जीवनात आनंद-

 

पती-पत्नीमध्ये भांडणं वाढले असेल आणि नाते तुटण्याच्या टोकाला पोहोचले असेल तर अशा घरात शालिग्राम ठेवावा. शालिग्राम नेहमी तुळशीच्या मुळाजवळ ठेवा आणि त्याची नियमित पूजा करा. तसेच दरवर्षी तुळशीविवाहाच्या दिवशी शाळीग्रामचा विवाह तुळशीशी लावावा. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आपोआप येऊ लागेल.

तीर्थयात्रेप्रमाणेच आहे पुण्य –

 

धार्मिक ग्रंथांनुसार ज्या घरात शालिग्रामची स्थापना झाल्यानंतर त्याची नित्य पूजा केली जाते, त्या घरातील लोकांना सर्व तीर्थांचे उत्तम पुण्य प्राप्त होते. याच्या नियमित दर्शनाने व उपासनेने तीर्थक्षेत्रातील यज्ञ व पवित्र स्नानासारखे फळ मिळते. शालिग्राम दगडाचे पाणी घरामध्ये शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा संपते अशी मान्यता आहे.

शालिग्रामची पूजा कशी करावी?

पूजेच्या ठिकाणी पिवळे वस्त्र टाकून चांदीच्या किंवा स्टीलच्या ताटावर शालिग्राम ठेवा आणि पंचामृताने स्नान करा. यानंतर शालिग्रामवर चंदन लावा. तुळशीचे पान अर्पण करा. फळे, फुले आणि मिठाई अर्पण करा. धूप-दीप लावा आणि भगवान विष्णूचे ध्यान करताना हळदीच्या माळाने विष्णूजींच्या मंत्रांचा जप करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)