Shani Amavasya 2023 : शनिश्चरी अमावस्येला होणार शनिदेवाची कृपावृष्टी, कर्माला भाग्याची साथ मिळण्यासाठी या गोष्टी करा

| Updated on: Oct 12, 2023 | 9:09 AM

शनिश्चरी अमावस्या ही न्यायदेवतेला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा-अर्चा केल्याने शनिदेवाची आशीर्वाद प्राप्त होते आणि दुःख आणि दुःखापासून मुक्ती मिळते. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दु:खापासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.

Shani Amavasya 2023 : शनिश्चरी अमावस्येला होणार शनिदेवाची कृपावृष्टी, कर्माला भाग्याची साथ मिळण्यासाठी या गोष्टी करा
शनि उपाय
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : पितृ पक्षातील अमावस्या सर्वपित्री अमावस्या (Shani Amavasya 2023) म्हणून ओळखली जाते. 14 ऑक्टोबर हे पितृपक्षातील शेवटचे श्राद्ध आहे आणि या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान इत्यादी विधी केले जातात. या वेळी सर्वपित्री अमावस्या शनिवार असल्याने ती शनिश्चरी अमावस्या म्हणूनही ओळखली जाणार आहे. शनिश्चरी अमावस्या ही न्यायदेवतेला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा-अर्चा केल्याने शनिदेवाची आशीर्वाद प्राप्त होते आणि दुःख आणि दुःखापासून मुक्ती मिळते. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दु:खापासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. सर्वपित्री अमावस्येला काही उपाय केल्यास पितरांना मोक्ष मिळण्यास मदत होते. अशा स्थितीत जर तुम्हालाही शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर शनिश्चरी अमावस्या तिथीला शनि स्तोत्राचे पठण करा. याशिवाय शनि मंत्राचा जप केल्याने विशेष फळ मिळते.

शनिश्चरी अमावस्येला करा हो उपाय

सौभाग्य प्राप्तीसाठी : तंत्रशास्त्रानुसार शनि अमावस्येच्या दिवशी काळ्या गाईची पूजा करावी.  गाईची पूजा केल्यानंतर तीला  हिरवा चारा खाऊ घाला आणि सात वेळा प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा केल्यावर, गाईच्या शेपटीचा स्पर्श आपल्या डोक्याला करावा. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि जीवनातील सर्व दुःख, संकटे दूर होतात.

भाग्योदयासाठी : या दिवशी शनि मंदिरात तीन कोळसे, खिळे, काळा कपडा शनिदेवासमोर ठेवावा. तिळाच्या तेलात स्वःताची सावली पाहून ते तेल मंदिरात दान करावे. प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाला हात जोडून प्रार्थना करावी.

हे सुद्धा वाचा

दान धर्म करा : गरीब आणि गरजूंना मदत करणाऱ्यांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. तुम्हालाही शनिदेवाचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही दानधर्म करत राहा. शनिदेवाच्या आशीर्वादासाठी काळा हरभरा, काळे तीळ, उडीद डाळ आणि स्वच्छ कपडे गरजूंना दान करत राहावे.

शनि यंत्राची पूजा : जर तुम्हाला तुमच्या जीवनात पैसा, नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या येत असतील तर या दिवशी सकाळी स्नान करून शनी यंत्राची पूजा करावी. यामुळे तुमची नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुमच्या कुटुंबात समृद्धी येईल.

शनि मंत्राचा जप करा : ज्योतिष शास्त्रानुसार शनि मंत्राचा जप करणे अत्यंत फायदेशीर ठरते. शनि मंत्राचा जप केल्याने भगवान शनि खूप प्रसन्न होतात आणि जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळवून देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)