Shani Amavasya : शनि अमावस्येला जुळून येत आहे तीन शुभ योग, साडेसाती असणाऱ्यांनी अवश्य करा हे उपाय

| Updated on: Jun 13, 2023 | 7:41 PM

साडेसाती सुरू होताच शनिदेवाची प्रकोप टाळण्यासाठी लोकं शनिदेवाशी संबंधीत अनेक प्रकारचे उपाय सुरू करतात. यावेळी 17 जून रोजी शनी अमावस्या (Shani Amavasya 2023) साजरी होणार आहे.

Shani Amavasya : शनि अमावस्येला जुळून येत आहे तीन शुभ योग, साडेसाती असणाऱ्यांनी अवश्य करा हे उपाय
शनि
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : शनिदेवाला कर्माचा दाता आणि शासन करणारा म्हणतात. साडेसाती आणि अडीचकीच्या काळात ते माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. यामुळेच साडेसाती सुरू होताच शनिदेवाची प्रकोप टाळण्यासाठी लोकं शनिदेवाशी संबंधीत अनेक प्रकारचे उपाय सुरू करतात. यावेळी 17 जून रोजी शनी अमावस्या (Shani Amavasya 2023) साजरी होणार आहे. अशा वेळी ज्यांना शनिदेवाच्या साडेसाती, अडिचकी किंवा महादशेचा त्रास होतो, त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केले जाऊ शकतात.

शुभ योग

शनीची साडेसाती आणि अडिचकीने त्रासलेल्यांसाठी 17 जून हा दिवस खूप खास आहे. यावेळी 17 जून रोजी शनि अमावस्या असून या दिवशी शनिदेवही प्रतिगामी होणार आहेत. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न केल्यास साडेसाती, अडिचकी आणि महादशा यांचा प्रभाव कमी होऊ शकतो.

पाठ

शनि अमावस्येच्या दिवशी हनुमानाला तुळशीची माळ अर्पण करावी. असे केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि त्यांच्या प्रसन्नतेमुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो. यासोबतच या दिवशी सुंदरकांड आणि बजरंगबाण पठण करणे देखील लाभदायक आहे. या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात शेंदूर, चमेलीचे तेल, लाडू आणि एक नारळ अर्पण करावा.

हे सुद्धा वाचा

मंत्र

शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवाचा बीज मंत्र ‘ओम शन्नो देवी रभिष्टया आपो भवनतु पीतये, शं योराभिश्रवंतु न:’ याचा जाप करावा. या मंत्राचा 23 हजार वेळा जप केल्याने शनीच्या साडेसाती आणि अडिचकीचा अशुभ प्रभाव दूर होतो.  या दिवशी ज्यांना साडेसाती आणि महादशेचा त्रास होत असेल त्यांनी उपवास करावा. या दिवशी काळी उडीद डाळ दान करणे खूप फायदेशीर मानले जाते.

दान

शनि अमावस्येला रक्षास्त्रोत पठण करा आणि आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शनीला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे. शनि अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड पोळी खाऊ घालणे फायदेशीर आहे. दुसरीकडे, पितरांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घालणे पुण्यकारक मानले जाते. या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात आणि साडेसाती आणि अडिचकी असणाऱ्यांना लाभ होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)